शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालवण-मुंबई बस उलटून सात गंभीर

By admin | Updated: September 15, 2014 23:23 IST

आरवलीनजीकची दुर्घटना

देवरुख/आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिंदेआंबेरी येथे एस.टी.चा बे्रक अचानक अडकल्याने मालवण डेपोची बस उलटून सात प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना आज, सोमवारी दुपारी २ वाजता घडली.मानसी साळुंखे (वय ३०, रा. चिपळूण), संस्कृती साळुंखे (८), वसंत राणे (७३, रा. कणकवली), गणपत साळगावकर (८६, रा. मालवण), मालती गणपत साळगावकर (८१), अर्चना आत्माराम कांबळे (४६) आणि आत्माराम कांबळे (५०, रा. म्हाबळे) हे प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये मालवण डेपोचे बसचालक आनंद दयाळ पवार (४५, रा. वायरी-मालवण) यांनी दिली. पवार आपल्या ताब्यातील बस मालवणहून मुंबईला घेऊन जात होते. ही बस आरवलीनजीकच्या शिंदेआंबेरी येथे आल्यानंतर पवार यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्रेक अचानक अडकल्याने बस डाव्या बाजूला पलटी होऊन गाडीतच प्रवासी काहीवेळ अडकून पडले. अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील स्थानिक लोक जमा झाले. त्यांनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले. यामधील सात प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघाताची खबर कळताच माखजन दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल एस. एस. भुजबळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदतकार्य व पंचनामा केला. (प्रतिनिधी/वार्ताहर)