शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पदे देताना निष्ठा तपासली जाणार

By admin | Updated: July 27, 2014 23:59 IST

-शरद पवार १0 आॅगस्टला जिल्ह्यात

व्हिक्टर डॉन्टस : सावंतवाडीत राष्ट्रवादीची बैठकसावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँॅग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीनेही आता जिल्ह्यात आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत केसरकर हे शिवसेनेत रितसर प्रवेश करणार नाहीत, तोपर्यंत पक्षात कोणालाच पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांनी दिली. ते येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार हे १० आॅगस्टला जिल्ह्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यापुढे पदे देताना पक्षावरची निष्ठा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितले.याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँॅग्रेसची खास बैठक येथील विश्रामगृहावर पार पडली. यावेळी उल्हास गावडे यांच्यासह नूतन पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष डान्टस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डान्टस म्हणाले, आम्ही जिल्ह्यात सध्या आस्ते कदम जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार केसरकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याबरोबर शिवसेनेत कोण कोण जाणार, याची चाचपणी केली जाईल. त्यानंतरच पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत अनेकांनी पक्षात थांबणार असल्याचे सांगितले आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)राजन तेलींशी संपर्क केला नाही : डॉन्टसराष्ट्रवादी काँॅग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांजवळ माजी आमदार राजन तेली यांच्याबाबत शब्द टाकला, अशी चर्चा सुरु आहे. ती पूर्णत: खोटी असून, मी कुठल्याही नेत्याकडे तेलींची शिफारस केली नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष डान्टस यांनी केला आहे. तसेच तेलींनी काही प्रयत्न केले असल्यास याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. -शरद पवार १0 आॅगस्टला जिल्ह्यातपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १० आॅगस्टला सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून, त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यांचा हा दौरा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न असून कार्यकर्ते ठिकठिकाणी अध्यक्षांचे स्वागत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.