शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मासे विक्रेत्यांवरही प्रशासनाची करडी नजर

By admin | Updated: January 29, 2015 23:31 IST

फसवणूक थांबण्यासाठी उपाययोजना

रत्नागिरी : लाकडी फळीच्या तुकड्यावर वेगवेगळ्या स्टीलच्या ताटलीतून लावलेले माशांचे वाटे, सुरमई, मोडोसा, कर्ली, गेदर यांसारखे मासे फळीवर मांडलेले. ग्राहकांच्या मागणीवरून तेथेच मासे स्वच्छ व कापून दिले जातात. बर्फाचे ओघळणारे पाणी, त्यातूनच जपून पाय टाकून जात माशांची पारख करणारे ग्राहक, साफ केलेल्या माशांचे अवशेष खाण्यासाठी अधूनमधून पळणारी मांजरे तसेच मांजराला घाबरून पळणारे उंदीरमामा अवघे चित्र प्रत्येक मच्छिमार्केटमध्ये दिसून येते. परंतु ग्राहकांना स्वच्छ व ताजे मासे दिले जावेत याकरिता आता अन्न व औषध प्रशासनाची नजर संबंधित मच्छि मार्केट व विक्री करणाऱ्या ग्राहकांवर यापुढे राहणार आहे.आपल्याकडे निम्म्याहून अधिक लोक मांसाहार करतात. शाकाहार सेवन करणारी मंडळी निम्मी असली तरी आतापर्यंत खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासन नेहमीच जागरूक राहिले आहे. परंतु यापुढे मांस, मासे विक्रेतेही दृष्टिपथात राहणार आहेत. मांसाहार करणाऱ्या मंडळींना ताजे व स्वच्छ मांस, मासे मिळावे. मांस किंवा मासे कापून दिले जाताना स्वच्छ पाण्याचा केला जाणारा वापर तसेच मटण व मच्छी मार्केटमध्येही स्वच्छता आवश्यक आहे. मुंबई, पुण्यासारख्या मॉलमध्ये माशांची विक्री प्लास्टिकच्या वेस्टनातून किंवा पिशव्यातून केली जाते. मात्र, कोकणातील बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मासे आणण्यासाठी केला जातो. बहुतांश ग्राहक मासे विके्रेत्यांकडून स्वच्छ करून किंवा कापून घरी नेतात. ज्यावेळी माशांची कमरता असते अशावेळी बर्फातील मासे विक्रीस आणले जातात. दीर्घकाळ बर्फात राहिल्याने माशांच्या चवीत फरक पडतो. मासे ताजे दिसण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केला जातो. यापुढे ग्राहकांना ताजे व स्वच्छ मासे उपलब्ध व्हावेत, याकरिता अन्न औषध प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. वेळोवेळी मच्छी मार्केटमध्ये भेट देऊन तेथील स्वच्छतेबाबत सूचना करण्यात येणार आहेत. शिवाय विक्रेत्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)फसवणूक थांबण्यासाठी उपाययोजनाविक्रेते मासे विकताना ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी व मासे ताजे भासविण्यासाठी नानाविध क्लृप्त्या योजतात. बोंबील किंवा मांदेली सारखे मासे ताजे दिसण्यासाठी लाल रंगाच्या पाण्यातून बुडवून काढले जातात. मासे खरेदी करताना ग्राहक माशांचे डोक्यांचा भाग पाहून किंवा त्यांच्या त्वचेला स्पर्श करून पाहतात. हे मासे कडक असल्यास तो मासा ताजा असल्याची ग्राहकाची खात्री पटते, तर डोक्याचा भाग उघडल्यावर ते लालसर भासल्यास मासा चांगला आहे, असे म्हटले जाते. मात्र, ग्राहकांना येथेच फसविले जाते. डोक्याच्या ठिकाणी लाल रंग पसरविला जातो, तर माशांच्या खवल्यांवर गम लावला जातो. त्यामुळे पारखणारा ग्राहकदेखील फसतो. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विके्रत्यांवरच अन्न औषध प्रशासन करडी नजर ठेवणार आहे.