शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उभादांडा केपादेवी शाळेला कुलूप

By admin | Updated: August 21, 2014 00:30 IST

ग्रामस्थ आक्रमक : शिक्षक हजर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वेंगुर्ले : कायमस्वरुपी शिक्षक देण्याचे गटविकास अधिकारी यांनी पत्र देऊनही शाळेत शिक्षक हजर न झाल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आज उभादांडा मूठ येथील केपादेवी शाळेला कुलूप ठोकले. तसेच उद्या, २१ पर्यंत शाळेत दोन पदवीधर शिक्षक कायमस्वरुपी हजर न झाल्यास शाळा केपादेवीची मुले पंचायत समितीत शाळा भरवतील, असा इशारा पालक, ग्रामस्थांनी दिला आहे. मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी मागणी करून केवळ तात्पुरता शिक्षक उपलब्ध करून शिक्षण खात्याचे प्रत्येकवेळी वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. आतापर्यंत या शाळेत १३ तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक करून शिक्षण खात्याने एक वेगळाच विक्रम केला आहे. पालकांनी वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण खात्याकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. पालक व्यवस्थापन समितीने दिलेल्या पत्रानुसार शिक्षण विस्तार अधिकारी गोडे यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या शेरेबुकात स्वत: नोंद केली असून, कायमस्वरुपी शिक्षक देण्याचे मान्य केले. तर गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी आपल्या सहीशिक्क्यानुसार उमेश पडूळ या शिक्षकाची नेमणूक केल्याचे पत्र शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पेडणेकर यांना १६ आॅगस्ट रोजी दिले आहे. मात्र, हा शिक्षक १९ आॅगस्टपर्यंत उपस्थित न राहिल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला टाळे ठोकले. तसेच कायमस्वरुपी शिक्षक नेमणूक न झाल्यास २१ आॅगस्टपासून पंचायत समितीत शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप नामदेव डिचोलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)