शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तोंडवली, तळाशील वीज समस्येने त्रस्त

By admin | Updated: February 26, 2015 00:20 IST

आचरा वीज कार्यालयावर धडक : वीज अभियंत्यांचे पाहणीचे आश्वासन

आचरा : तोंडवली-तळाशील भागात जीर्ण झालेल्या विद्युतवाहिन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वीज समस्या निर्माण होत होती. त्यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करून वीज वितरण मंडळाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार तोंडवली-तळाशील भागात वीजवाहिन्या व खांब बदलण्याचे काम ठेकेदाराने चालू केले आहे. परंतु, प्रत्यक्षात फक्त खांब बदलून जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलल्याच जात नसल्याचे समजताच तोंडवली सरपंचांसह ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी आचरा वीज वितरण कार्यालयात मंगळवारी दाखल झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी होत असलेल्या कामाची पाहणी करण्याची मागणी वीज वितरणचे अभियंता बोटलवार यांच्याकडे केली.यावेळी तोंडवली सरपंच संजय केळुसकर, दिलीप पुजारे, सदानंद पाटील, दीपक कांदळकर, प्रशांत चोडणेकर, रवी पाटील उपस्थित होते. यावेळी सरपंच केळुसकर म्हणाले की, प्रत्यक्षात ग्रामस्थांनी मागणी केलेले काम होत नसून ठेकेदार आपल्या मर्जीने काम करत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे.यावेळी सरपंच यांनी खांब बदलण्याचे काम निकृष्ट असून, प्रत्यक्षात वायर कंडक्टर बदलले जात नसून अभियंत्यांनी पाहणी करावी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार वायर जोडणीचे काम कराव;े अन्यथा काम होऊ न देण्याचा इशारा दिला.यावेळी वीज वितरणचे अधिकारी बोटलवार यांनी अभियंता व वायरमन यांना पाठवून ग्रामस्थांच्या माणगीनुसार काम करून घेण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)वायरमनचा मनमानी कारभारवीज समस्येबाबत व्यथा मांडताना ग्रामस्थ दिलीप पुजारे म्हणाले, आज तोंडवली गावच्या ट्रान्स्फॉर्मरचा फ्यूज गेला तर पूर्ण रात्र अंधारात घालवावी लागत आहे. वायरमनशी संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे देतात. ग्रामस्थ जीव धोक्यात घालून फ्यूज स्वत: घालतात. उद्या त्यांचे बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला. ट्रान्स्फॉर्मरच्या खाली असणारी संरक्षक पेटी पूर्ण जीर्ण झाली असून, एखाद्या छोट्या मुलाच्या हाती लागेल अशी पेटी बसवलेली आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात धोका संभवतो. मीटर जोडणीसाठी अथवा कनेक्शन जोडणीच्यावेळी वायरमन ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत.