शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केसरकर हेच भावी पालकमंत्री विनायक राऊत यांचे सूतोवाच : कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार

By admin | Updated: May 19, 2014 00:29 IST

सावंतवाडी : भविष्यात कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट ठरविण्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञांची मदत घेणार आहे. विकास थांबविणार म्हणणार्‍या नारायण राणे यांनी कोकणचा कोणता विकास केला हे स्पष्ट करावे,

 सावंतवाडी : भविष्यात कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट ठरविण्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञांची मदत घेणार आहे. विकास थांबविणार म्हणणार्‍या नारायण राणे यांनी कोकणचा कोणता विकास केला हे स्पष्ट करावे, असे सांगत आमदार दीपक केसरकर हे भविष्यातील सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील, असे सूतोवाच नूतन खासदार विनायक राऊत यांनी केले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, संपर्कप्रमुख शैलेश परब, माजी आमदार सि. स. सावंत, मंगेश तळवणेकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, भाजपचे राजन म्हापसेकर, अनारोजीन लोबो, दत्ता घाटकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, मी चिंतामणराव देशमुख यांचे ‘मराठी बाणा’ पुस्तक वाचले होते, पण आधुनिक बाणा खर्‍या अर्थाने आमदार दीपक केसरकर यांनीच दाखविला असून, त्यांची दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. नारायण राणे यांनी दिलेला राजीनामा हा स्टंट आहे; पण आणखी तीन महिन्यानी त्यांना खरोखरच राजीनामा द्यावा लागेल आणि भविष्यातील पालकमंत्री दीपक केसरकर असतील, असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला प्रवाहाच्या विरोधात पोहायला सांगितले होते. आमदार दीपक केसरकर हे प्रवाहाच्या विरोधात पोहत गेले आणि त्यामुळेच ते किनार्‍याला पोहोचले, असे सांगत आता भगव्याची लाट विधानसभा निवडणुकीतही दिसेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. मायनिंग तसेच रेडी बंदर, आरोंदा जेटी, आदी दलालांचे प्रकल्प असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची प्रकिया आम्ही सुरू करणार आहोत. सिंधुदुर्गचा विकास व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे; पण पायाभूत सुविधाही आवश्यक आहेत, असे सांगून यापुढे रोजगारावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत यांचे आमदार केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी संदीप टोपले, नकुल पार्सेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, सुदन आरेकर, सोमकांत नाणोस्कर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)