शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे एकरांतील काजूबाग खाक

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

भीषण आग : पंधरा हजार काजू कलमे, तीनशे आंबा कलमे जळाली; दीड कोटी रुपयांचे नुकसान

तळवडे : निरवडे-न्हावेली-पेंडूर सीमेवरील बागायतीस आज, सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये १५० एकरांतील काजू बागायतीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शेतकऱ्यांची पंधरा हजार काजू कलमे तसेच तीनशे आंबा कलमे जळाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आगीचे वृत्त कळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने मागवला. मात्र, ग्रामस्थांनीच ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, उशिरा घटनास्थळी तहसीलदार सतीश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. निरवडे गावातील शेतकरी सुधीर मल्हार, सुनील मल्हार, बाबली मल्हार, विवेक मल्हार, चंद्रशेखर मल्हार, नंदा मल्हार, आरती मल्हार, रमाकांत मल्हार, नामदेव परब, लीलावती परब, सुहासिनी परब, रमाकांत मल्हार, सुरेश गोडकर, नामदेव मल्हार, विवेक मल्हार, आनंद परब, न्हावेली (पेंढऱ्याचीवाडी) गावातील शेतकरी विजय नाईक तसेच निरवडे व पेंडूर सीमेवरील ५० कुटुंबीयांच्या सुमारे १५० एकर जागेतील काजू बागायतीचे नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अखेर तिन्ही गावांतील शेतकरी एकत्र आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, घटनास्थळी निरवडे तलाठी स्मिता परब यांच्यासह निरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत मल्हार व अन्य ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)गतवर्षीच्या आगीच्या नुकसानीची भरपाई अजून नाहीच...निरवडे गावात गेल्या वर्षी २०० ते २५० एकर जागेत आग लागली होती. यात शासनाने ८० लाखांचा नुकसानीचा पंचनामा केला होता; परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या आगीत शेतकऱ्यांची आंबा व काजू कलमे जळून भस्मसात झाली होती. एक वर्षानंतरही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. या नुकसानीची पाहणी तहसीलदार, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री स्तरापर्यंत निवेदने दिली होती; परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती बागायतीचा विमा उतरवण्यात आला नाही. विमा उतरविला, तरच आग, वादळ, पाऊस अशा नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते. अशी मोहीम शासनाने सिंधुुदुर्ग जिल्ह्यात अग्रक्रमाने राबविल्यास गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.