शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

ते बांधकाम तोडण्याचे निर्देश : राष्ट्रीय महामार्ग विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 5:09 PM

शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे.

ठळक मुद्देबांदा तपासणी नाका नियमबाह्य बांधकाम झाल्याचे उघड

बांदा : बांदा सटमटवाडी सीमा तपासणी नाका व त्या संबंधित इमारतीचे बांधकाम सर्व नियम धाब्यावर बसवून केल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंणरेषा मार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर नियमानुसार बांधकाम होणे अपेक्षित असताना केवळ २६ मीटरवर बांधकाम केले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून पंधरा दिवसांत स्वखर्चाने बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी (कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय) यांनी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, बांद्रा (पूर्व), मुंबई यांना दिले आहेत. या आदेशामुळे ठेकेदार कंपनी मोठ्या अडचणी सापडली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना रा.म.क्र. १७) मधील बांदा सटमटवाडी स. १८९ क्षेत्र ११.९५.५० हे.आर. येथील आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका भूसंपादन प्रक्रियेपासूनच वादाचा ठरला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे हा टोलनाका व त्या संबंधित इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.

याविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी लढा उभारला आहे. बेसुमार वृक्षतोड, खनिजयुक्त मातीचोरी, बेकायदा बांधकाम त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे.

शासनस्तरावरून हे बांधकाम करण्याची परवानगी मिळविल्यास, तसे अभिलेखे सादर करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापपर्यंत तसे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण