शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी करा

By admin | Updated: August 13, 2015 23:12 IST

सभापतींचे आदेश : वैभववाडी पंचायत समिती कृषी विभागात संशयास्पद कामे

सिंधुदुर्गनगरी : शेतकरी मासिकाच्या रकमेची पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून या पैशांबाबत संशय वाटतो असा आरोप करत चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या वैभववाडी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे यांनी केली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सभेत दिले.जिल्हा परिषद कृषी समितीची सभा उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी दिलीप रावराणे, सोनाली घाडीगांवकर, योगिता परब, समिती सचिव तथा जिल्हा कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून (लाभार्थ्यांकडून) प्रत्येकी २५० रुपये शेतकरी मासिकासाठी घेतले जातात. या मासिकांच्या प्रति काही ठराविक म्हणजेच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना देण्यात येतात. उर्वरित शेकडो शेतकऱ्यांना पैसे देऊनही मासिक पावती मिळत नाही. तसेच पैसे दिल्याची पावतीही दिली जात नसल्याने मागील ३ वर्षांपासून या पैशाबाबत घोळ सुरु असल्याचा आरोप दिलीप रावराणे यांनी केला. तसेच वैभववाडीचे कृषी विस्तार अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार या मुद्यावर बोलताना सभापती रणजित देसाई यांनी रावराणे यांची मागणी मान्य करत चौकशीचे आदेश दिले.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ३७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्रशासनाकडे प्राप्त आहे. मात्र वितरणाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ती लवकरात लवकर वितरीत करावी. तसेच एकाच सातबारावर अनेक भागदारांची नावे असल्यानेही अनेक शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित रहात आहेत. यापुढे अन्य भागधारकांनी हमीपत्र दिल्यास संबंधित लाभधारकास या नुकसान भरपाईचा लाभ देण्याची मागणी करणारा ठरावही करण्यात आला. (प्रतिनिधी)अखेर पाणलोट सचिवांचे मानधन मिळालेपाणलोट सचिवांना मागील ९ महिन्यांपासून मानधन दिले गेले नसल्याबाबतची बाब सभागृहासमोर आली होती. याची गंभीर दखल घेत उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पाणलोट सचिवांचे थकीत ९ महिन्यांचे मानधन जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर ते मानधन संबंधित सचिवांना अदा करण्यात आले.शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भावशेतीवर पडलेला करपा, अळी व अन्य रोगांवरील किटकनाशक उपलब्धता व फवारणीबाबतची माहिती ग्रामसेवकांमार्फत शेतकऱ्यांना द्यावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.