शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आठवडा बाजारातही पिकते महागाई

By admin | Updated: November 23, 2014 00:45 IST

व्रतवैकल्यांना महागाई डसली : भाज्यांच्या दरांची गगनाशी स्पर्धा, फळांनी गाठली शंभर

रत्नागिरी : दैनंदिन आहारात लागणाऱ्या भाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. कडधान्यांचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खाणेही मुश्किल बनले आहे. स्वस्त बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडा बाजारातही महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच उद्यापासून व्रतवैकल्याचा मार्गशीर्ष सुरू होत आहे. त्यामुळे भाज्या व फळे यांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन आधीच भाज्या आणि फळांचे दर कडाडले आहेत.आठवडा बाजारात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाजी विक्रेते अधिक येतात. त्यांच्या तुलनेत स्थानिक विक्रेत्यांची संख्या मात्र ५ ते ७ टक्के इतकीच आहे. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, फळेविक्रेते मोठ्या संख्येने येतात. दरमहा किराणा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असली तरी दर आठवड्याला लागणाऱ्या भाज्या, कांदे, बटाटे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. आठवडा बाजारात भाज्यांचे दर चांगलेच वाढले असून त्याच्या जोडीला हिरवी मिरची ४० रूपये, आलं ८० रूपये किलो दराने विकण्यात येत होते. गतआठवड्यात २० रूपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोचे दर खाली आले आहेत. १० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे.शेपू, मेथी, पालक, मूळा, माठ पालेभाज्या १५ रूपये जुडी तर आंबट चुका, कोथींबीर १० रूपये जुडी दराने विकण्यात येत होती. कोबी गड्डे १० ते २० रूपये प्रति नग तर फ्लॉवर २० ते २५ रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत होते.स्थानिक विक्रेत्यांकडे मूळा, माठ, पावटा, वांगी, पडवळ, दोडकी, काकडी, भोपळा, दूधी भोपळा, आमसूले, नारळ, कुळीथ, भेंडी, गावठी अंडी, गवती चहा यांची विक्री सुरू होती. गावठी पावटा १०० रूपये किलो, भेंडी ८० रूपये किलो, पडवळ, दोडके ६० रूपये किलो दराने विकण्यात येत होते. वालीच्या शेंगा, माठ, मूळा १५ रूपये जूडी, भोपळ्याची कापलेली शेड १० ते १२ रूपये, दूधी भोपळा २५ ते ३० रूपये प्रति नग, नारळ २० ते २५ रूपये प्रति नग, गावठी अंडे ५ ते ६ रूपये दराने विकण्यात येत होते. कुळीथाची विक्री ८० रूपये किलो दराने सुरू होती. मार्गशीर्षामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत सुवासिनी, कुमारिका करतात. यावेळी महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही या उत्सवाने जोर घेतला आहे. त्यामुळे ही व्रतवैकल्ये आता ग्रामीण महिलाही करताना दिसतात. पर्यायाने या काळात भाज्यांचे आणि फुलांचे दर वाढतात. यादिवशी दिवसभर उपवास केला जातो. पूजेसाठी पाच फळे आवश्यक असतात. शिवाय दर्शनाला येणाऱ्यांना फळे, फुले देण्याची प्रथा आहे. त्यामुळे श्रावणमासाप्रमाणे मार्गशीर्षातही फळांचा खप वधारतो. बाजारात सफरचंद, मोसंबी, संत्री, चिकू, केळी, पेरू, डाळींब, पेर, टरबूज, पपई आदी विविध प्रकारची फळे विक्रीस उपलब्ध आहेत. थंडी अद्याप गायब असून उष्मा मात्र वाढला आहे. उकाड्याने हैराण होत असल्याने लिंबूपाणी, लिंबू सरबताचा खप वाढला आहे. लिंबूला मागणी वाढल्याने १० रूपयाला ४ ते ५ नग दराने विक्री सुरू आहे. (प्रतिनिधी)