शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थ विक्रीतून वाढतोय दहशतवाद

By admin | Updated: July 24, 2014 22:45 IST

पैशातून दहशतवाद : राज्य उत्पादन शुल्क खाते अलर्ट

चिपळूण : अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून, त्यामुळे देशाचे भविष्य अंधारमय आहे. अंमली पदार्थांची अवैध मार्गाने विक्री केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. या पैशातून दहशतवाद पोसला जातो. म्हणून पोलीस राज्य उत्पादन शुल्क खाते अ‍ॅलर्ट झाले आहे. चिपळूण शहर व परिसरात युनायटेड इंग्लिश स्कूल, सती हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, रिगल कॉलेज, कालुस्ते हायस्कूल, गुरुकुल, माता रमाई महाविद्यालय, डी. बी. जे. महाविद्यालय, नॅशनल हायस्कूल, मिरजोळी, परांजपे मोतीवाले हायस्कूल, एसपीएम भोगाळे, बांदल हायस्कूल, शिवाजीनगर एस. टी. स्टॅण्ड या परिसरात मुक्तांगण मित्र, पुणे व गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे पथनाट्य सादर करण्यात आले. या जनजागरण मोहिमेमुळे समाजात वाढलेली व्यसनाधिनता व त्यातून निर्माण होणारा दहशतवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी पथनाट्य, लघुपट, प्रश्नोत्तरे, अनुभव कथन असे कार्यक्रम झाले. चिपळूणचे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह आंधळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस नाईक पप्या चव्हाण यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. चिपळूण तालुक्यात अंमली पदार्थ बाळगण्यापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जसे प्रयत्न सुरू केले आहेत, तसे या प्रयत्नाना नागरिकांनी व महाविद्यालये, हायस्कूल्स यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. या सामुहिक प्रयत्नातून अशा व्यसनाधिनतेपासून तरूण पिढीला दूर ठेवणे शक्य होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उत्पादन शुल्कची भूमिका महत्त्वाचा आहे. (प्रतिनिधी)पैशातून दहशतवाद पोसला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच राज्य पोलीस उत्पादन शुल्क खाते अलर्ट झाले आहे. हायस्कूल पातळीवर आता हे प्रयत्न सुरू झाले आहेत.