शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूसदृश रूग्णांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: November 2, 2014 00:41 IST

हिवताप विभाग मात्र निद्रिस्त

सिंधुदुर्गनगरी : वातावरणाच्या बदलामुळे जवळ जवळ संपूर्ण राज्यात डेंग्यू तापाने थैमान मांडले असून त्याची थोड्या प्रमाणात झळ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसत आहे. जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असून हिवताप विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ही साथ रोखण्यासाठी या विभागामार्फत फॉगींग मशिनद्वारे फवारणी अथवा कोणतीही प्रचार प्रसिद्धी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, बारामती यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गेले काही दिवस डेंग्यू तापाने थैमान मांडले असून या साथीचे हजारो रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेताना दिसून येत आहेत. या साथीच्या आजारामुळे राज्यात तीन युवतींचाही मृत्यू झाला आहे. अशा या भयानक साथीची काही अंशी झळ सिंधुदुर्गाला बसत असल्याचे रुग्णालयात तापाच्या वाढत्या रुग्णांवरून दिसून येत आहे. हे रुग्ण डेंग्यूसदृश्य व मलेरियाचे असल्याचे निष्पन्न होत आहेत. वातावरणातील बदलामुळे व ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहिल्यामुळे या रोगाचा फैलाव होत आहे.सध्या दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी पडली असून सुट्टीची मजा लुटण्यासाठी लहान मुले व त्यांचे पालक मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्या नातलगांजवळ गेले आहेत. त्याठिकाणी डेंग्यूची साथ आहे. आता शाळा सुरु होणार असल्याने ती मुले पुन्हा आपल्या गावी येणार आहेत. त्यामुळे या साथीचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सर्वस्वी कल्पना आरोग्य यंत्रणेला माहित असतानाही हिवताप विभागाच्यावतीने अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. शहरांच्या ठिकाणी फॉगींग मशिनने फवारणी करणे तसेच डेंग्यू या आजाराबाबत जनजागृती करणे, गृहभेट देणे गरजेचे होते. मात्र, तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.आरोग्य यंत्रणेने गाफिल राहू नयेजिल्ह्यात गेल्या वर्षापासून कोणत्याही साथरोगाचा फैलाव झालेला नाही. जिल्हा हा स्वच्छ असल्याने व आरोग्य यंत्रणेच्या कामकाजामुळे गेल्यावर्षीपासून कोणताही साथरोग उद्भवलेला नाही. मात्र, सद्यस्थितीत तापाचे रुग्ण वाढले असून आरोग्य विभागाने तत्काळ मोहीम आखून जनजागृती करून तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. (प्रतिनिधी)