शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘असर’च्या अहवालाची होळी

By admin | Updated: February 2, 2015 00:07 IST

प्राथमिक शिक्षक समितीची निदर्शने : ‘प्रथम’ संस्था शिक्षकांची बदनामी करत असल्याचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : प्रायोगिक शिक्षणाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि शिक्षकांची बदनामी करणाऱ्या ‘प्रथम’ या संस्थेच्या ‘असर - २०१४’ या अहवालाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने निषेध व्यक्त करीत संबंधित अहवालाची होळी केली. ‘प्रथम’ या संस्थेविरोधात जोरदार निदर्शने केली.महाराष्ट्रातील पहिली ते आठवीचा शैक्षणिक दर्जा अत्यंत सुमार असून, शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याबाबत ‘प्रथम’ या संस्थेने आपला असर अहवाल शासनाला दिला आहे. पाचवीतील ४६.५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या दर्जाचे वाचन करता येत नाही. आठवीतील ३२.९ टक्के विद्यार्थी भागाकाराचे गणित सोडवू शकत नाहीत. २२.८ टक्के विद्यार्थी छोटे-छोटे इंग्रजी शब्द वाचू शकत नाहीत, असे अहवालात निष्कर्ष काढले आहेत. या अहवालामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्राथमिक शिक्षक टीकेचे लक्ष बनले आहेत. पालकांचे लक्ष खासगी शिक्षणाकडे वळावे आणि शिक्षणाच्या खासगीकरणासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे, या दूषित हेतूने ‘प्रथम’ संस्थेने ‘असर - २०१४’ हा अहवाल दिला आहे. प्रथम संस्थेने एकूण शाळांपैकी केवळ १ टक्का शाळांच्या सर्वेक्षणावरून निष्कर्ष काढले आहेत. ज्यांनी सर्वेक्षण केले, त्यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीमात्र संबंध नाही. प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलेले नाही. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत असून, तो सुधारण्यासाठी आपली संस्था वाचन, लेखन व गणित विकास प्रकल्प राबवत असल्याचे दाखवून परदेशातील संस्थांकडून मिळणारा आर्थिक निधी हडप करण्यासाठी अशाप्रकारचे अहवाल तयार करीत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. याबाबत शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य महिला प्रतिनिधी सुरेखा कदम, कोकण विभागप्रमुख नामदेव जांभवडेकर, संतोष पाताडे, नंदकुमार राणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथे एकत्र येत ‘प्रथमद संस्थेच्या असर-२०१४ या अहवालाची जाळून होळी केली. संबंधित संस्थेचा निषेध व्यक्त केला. (प्रतिनिधी)