शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दोडामार्ग तालुक्यात मुसळधार; भेडशीत पुराच्या पाण्यात दोन गाड्या अडकल्या, पोलिस, स्थानिक युवकांनी चौघांना वाचविले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 1, 2024 12:19 IST

वैभव साळकर दोडामार्ग : बुधवारी रात्रभर कोसळणाऱ्या संततधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले असून सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. ...

वैभव साळकरदोडामार्ग : बुधवारी रात्रभर कोसळणाऱ्या संततधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले असून सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सगळेच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भेडशी येथील दोन्ही पुलांवर पुराचे पाणी आले असून या पुराच्या पाण्यात दोन गाड्या अडकल्या. यातील एक गाडी चंदगड येथील असून दुसरी कार उत्तरप्रदेश येथील आहे. या दोन्ही गाड्यात अडकून पडलेल्या चौघांनाही दोडामार्ग पोलीस व भेडशी येथील स्थानिक युवकांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन वाचविले. 

मशनु गंगाराम कांबळे (वय ३०) ज्ञानेश्वर नागोजी (२५, दोघेही रा .आसगाव नांदोडे ता. चंदगड) तर मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी (रा.उत्तरप्रदेश) अशी या युवकांची नावे आहेत.काल, बुधवारी रात्रीपासून दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे तिलारी नदीसह इतर सर्वच नदी - नाल्याना पूर आला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भेडशी येथील मुख्य पूल व पर्यायी पूल पाण्याखाली गेले आहेत. उत्तरप्रदेश येथील एका कारचालकाने पुराच्या पाण्यात गाडी घातली. पाणी जास्त असल्याने कार पाण्यात अडकली. तेव्हा या गाडीत दोघेजण होते. भीतीने ते आरडाओरडा करू लागले. एवढ्यात त्यांच्या पाठीमागून चंदगड येथील पिकअप गाडी आली. समोर कार पाण्यात अडकल्याचे पाहून त्यांनी त्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचविण्यासाठी पीक अप पुराच्या पाण्यात नेली आणि तीसुद्धा अडकली. याबाबतची माहिती दोडामार्ग पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतरी, उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस हवालदार विठोबा सावंत, दीपक सुतार, गजानन माळगावकर, अनिल कांबळे, व भेडशी येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. रिंग व दोरखंडाच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या चौघांनाही सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस