शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती नुकसानभरपाई पंधरा दिवसांत द्या

By admin | Updated: January 14, 2015 00:32 IST

वनपरिक्षेत्र कणकवली : काँग्रेसचा वन अधिकाऱ्यांना घेराव

कणकवली : वनपरिक्षेत्र कणकवलीमधील हत्तीबाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई येत्या पंधरा दिवसांत देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिला. जानवलीतील वनक्षेत्रपाल एस. आर. पाटील यांना घेराव घालण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश सावंत, पंचायत समिती सदस्य महेश गुरव, मिलिंद मेस्त्री आदींसह कार्यकर्त्यांनी वनक्षेत्रपाल पाटील यांना मंगळवारी सकाळी जानवली येथील कार्यालयात घेराव घालून जाब विचारला. गेल्या दोन वर्षांतील हत्ती बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अद्याप वाटप झालेले नाही. तसेच हत्ती अनेकदा तालुक्यात येऊन नुकसान करत आहेत. मात्र, त्यावर कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी उपाययोजना केली जात नसल्याबद्दल विचारण्यात आले. पाटील यांनी २०१२-१३ पासूनची वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानभरपाईची आकडेवारी सादर केली. विभागात फक्त अकरा प्रकरणांतील ८३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देणे बाकी असून तीन वर्षांत १२४ प्रकरणांत ८ लाख ५२ हजार रुपये भरपाई दिल्याचे सांगितले. तसेच शिल्लक नुकसानभरपाई येत्या पंधरा दिवसांत दिली जाईल, असे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले. तुटपुंंजी नुकसानभरपाईहत्तींकडून माडाचे नुकसान झाल्यास फक्त २४०० रूपये प्रती माड नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, नारळ देणारा एक माड हत्तीने तोडल्यास शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे धरणग्रस्तांना ज्याप्रमाणे झाडाच्या वयोमानाप्रमाणे मोबदला मिळतो त्या धर्तीवर नुकसानभरपाईसाठी शासनाने धोरण ठरवण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत यांनी सांगितले.