शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी तालुक्यात पाच गावांत वृक्षलागवड

By admin | Updated: June 5, 2015 00:18 IST

. मुंडे यांच्या स्मरणार्थ शासनाने ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त वृक्षलागवडीचा कार्यक्रम

रत्नागिरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताहअंतर्गत रत्नागिरी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील पाच गावांमध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला. ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत पाच गावांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यात आली. मुंडे यांच्या स्मरणार्थ शासनाने ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी पंचायत समितीतर्फे आज तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या पाच ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. ९ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत वृक्षलागवड करण्यात येणार असल्याने यंदा हा भाग वृक्ष लागवडीखाली येणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ जलशिवारमधून ही लागवड करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा या मोहिमेत समावेश असल्याने त्या परिसरात वृक्ष लागवड होणार आहे. यामध्ये चाफे, नाणीज, वरवडे, पिरंदवणे आणि खेडशी या पाच ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, समाज मंदिर, गावठाण, गायरान, शासकीय निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन व रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आवश्यक ती रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत पुरविण्यात आली आहेत. दरम्यान, पाच गावांत पार पडलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी जी. डी. साखरे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शंकर घुले, श्रीमती शिरधनकर, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी सकपाळे, सुर्वे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)