शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

मुंबई-गोवा महामार्ग : संगमेश्वर जवळ होणार उड्डाणपूल; चिपळूण, पाली, लांजा, राजापुरात पर्यायी मार्ग

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जमीन मोजणीचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पाली व लांजा या बाजारपेठांतून महामार्ग चौपदरीकरणाला विरोध झाल्याने शहराबाहेरून पर्यायी मार्ग (बायपास रोड), तर संगमेश्वरमध्ये उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जमीन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.गेल्या दीड दशकांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या मार्गावर आजवर शेकडो प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. ‘डेड ट्रॅक’ अशी भयावह ओळख झालेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी विशेष पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी महामार्ग चौपदरीकरणाची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जमीन मोजणीचे आदेशही दिले. पनवेल, महाड, पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना क्र. १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. इंदापूर ते कशेडी पायथा हा ८४.०० ते १६१.०० किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. कशेडी पायथा ते संगमेश्वर ओझरखोल हा १६१ ते २६५ किलोमीटरचा टप्पा आहे. संगमेश्वर ओझरखोेल ते राजापूर हा २६५ ते ३५१ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्पा आहे. राजापूर ते झाराप (गोवा) हा ३५१ ते ४५० किलोमीटर अंतराचा चौथा टप्पा आहे. (प्रतिनिधी)आहे.बाजारपेठा ओस पडणार ?चिपळूण, पाली, लांजा या बाजारपेठांमधून चौपदरीकरणास विरोध झाल्याने बाजारपेठेबाहेरून महामार्गासाठी पर्यायी जागेतून चौपदरीकरण होणार आहे. संगमेश्वरमध्येही उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर या बाजारपेठात बाहेरून वाहने न येता थेट वळसा घालून पुढील मुक्कामाला जाणार आहेत. परिणामी या बाजारपेठा ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेत तर ५० टक्के उलाढाल ही बाहेरून वाहनाने येणाऱ्यांकडून होत असल्याचीही चर्चा ३४ हजार झाडांची कत्तलरायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तिन्ही जिल्ह्यांतील १८९ गावांतील वाढीव जमीन घेतली जाणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्रे, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिनी यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. वनविभागाची चौपदरीकरणाच्या जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडावी लागणार आहेत. --राजापूरचा विषय केंद्राकडेजिल्ह्यात राजापूरमध्ये काही धार्मिक प्रार्थनास्थळांची काही जागा तसेच हनुमान मंदिर पूर्णत: चौपदरीकरणात जाणार असल्याने हे मंदिर वाचविण्याची स्थानिकांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे याठिकाणी बायपास रोडचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, याबाबतचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे राजापूरबाबतचा निर्णय प्रतीक्षेत आहे. तरीही या ठिकाणी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.