शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे उपोषण

By admin | Updated: December 1, 2014 00:19 IST

विविध मागण्या : सकारात्मक निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांचे विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता याची चौकशी करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गवस यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली.
ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित ठेकेदार महाआॅनलाईन कंपनीकडून त्यांना योग्य मानधन दिले जात नाही. प्रामाणिक काम करूनही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी १२ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. तर याच दरम्यान जिल्हा परिषदेसमोर दोन दिवस धरणे आंदोलन व एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले होते. आमदार नीतेश राणे यांनी संगणक परिचालक यांची भेट घेतली. त्यावेळी महाआॅनलाईनचे विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी दोन दिवसांत आपण संगणक परिचालकांना निश्चित करण्यात आलेल्या ८ हजार मानधनापैकी ४ हजार एवढी मानधनाव्यतिरिक्त खर्च करण्यात येणाऱ्या रकमेचा अहवाल देण्याचे मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांनी तसा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे या निधीचा घोळ केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
संगणक परिचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री यांची संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता या योजनेची परिपूर्ण माहिती घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गवस, सचिव आदेश परब यांनी दिली. मात्र, जोपर्यंत सकारात्मक निर्णय झाल्याचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन सुरुच राहील
असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले
आहे. (प्रतिनिधी)

ग्रामसेवक संघाचा पाठिंबा
जिल्ह्यात आपल्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात संगणक परिचालकांनी पुकारलेल्या बेमुदत ‘कामबंद’ आंदोलनास जिल्हा ग्रामसेवक संघटनेचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र संगणक परिचालक संघटना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी संगणक परिचालकांकडे वाढलेला कामाचा भार तसेच तालुक्याच्या ठिकाणी मासिक सभेला जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्च पाहता त्यांना परवडणारे नाही. तसेच त्यांच्याकडे १ ते ११ सॉफ्टवेअर, १ ते २७ नमुने तसेच सर्व प्रकारचे दाखले देण्याचे कामकाज असल्याने त्यांना पूर्णवेळ काम करावे लागते. त्यांना कुठलाही प्रवासभत्ता मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मागण्या व सुरु असलेले आंदोलन योग्य असून आमचा पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे.