शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

साखरोळीत कुटुंबाचा हल्ला; एक ठार

By admin | Updated: July 22, 2014 23:34 IST

एक गंभीरसह दोघे जखमी : हल्लेखोरांमध्ये महिलांचाही समावेश

दापोली : अख्खे घर साखरझोपेत असताना हातात तलवारी, कुऱ्हाड, कोयता व चॉपर घेऊन घराच्या मागचा दरवाजा तोडून आत शिरलेल्या चार महिलांसह तीन तरुणांनी आपल्या चुलत्याचा पाठलाग करून निर्घृण खून केला. एवढेच नव्हे, तर इतर तिघाजणांना जखमी केले आहे. त्यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. आज, मंगळवारी पहाटे दोन वाजता तालुक्यातील साखरोळी येथे ही घटना घडली. प्रथमदर्शनी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे भगतगिरी कारणीभूत असण्याची शक्यता अधिक आहे.साखरोळी नं. १ येथील हनुमानवाडीत रमेश पांडुरंग मिसाळ, त्यांची पत्नी ऋचिता रमेश मिसाळ, मुलगा रूपेश, सून प्रणया, दुसरा मुलगा प्रफुल्ल व नातू वेदांत आपल्या घरात गाढ झोपले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागच्या दारावर जोरदार लाथांचा तसेच शिव्यांचा आरडाओरडा ऐकायला येऊ लागला. काहीतरी विपरीत घडणार असे वाटत असतानाच मागचा दरवाजा तोडून सचिन संतोष मिसाळ, किरण संतोष मिसाळ, महेश शंकर मिसाळ, मीनाक्षी महेश मिसाळ, राधिका सचिन मिसाळ, सुनंदा संतोष मिसाळ व योगिता संतोष मिसाळ या सातजणांचा घोळका घरात शिरला. त्यांच्या हातात तलवार, कुऱ्हाड, चॉपर, कोयता यासारखी हत्यारे होती.या सातजणांनी समोर दिसेल त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यातील संशयित आरोपी सचिन मिसाळ (वय २२) याच्या हातात धारदार तलवार होती. त्या तलवारीने त्याने प्रथम रमेश मिसाळ या ५५ वर्षीय वृद्धावर जोरदार प्रहार केला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रूपेशच्याही पोटात तलवार खुपसण्यात आली.घरात जोरात आकांत चालू असताना जो तो घराबाहेर पडण्यासाठी समोरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. घरातील कोणीही बाहेर पळून जाऊ नये म्हणून सचिन व त्याच्या सहकाऱ्यांनी मुख्य दरवाजाला आधीच बाहेरून कडी घातली होती. मृत्यू बनून आलेल्या त्या सातजणांच्या टोळक्याने हाणामारी व हातातील शस्त्राने वार चालूच ठेवले होते. जीव वाचविण्यासाठी रमेश व रूपेश या बापलेकांनी खिडकीतून घराबाहेर उड्या टाकल्या. याचवेळी सचिन, महेश व किरण हे हातातील शस्त्रे घेऊन घराबाहेर आले. सचिनने पाठलाग करून रमेश मिसाळ यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला चढविला. त्यांच्या पोटात, पाठीवर, मानेवर, छातीवर जोरदार प्रहार केले. रमेश मिसाळ यांच्या शरीरावर तब्बल १९ वार झाले असल्याने ते निपचित पडले. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)भगतगिरीचे कारण ?जमिनीचा वाद हे मुख्य कारण असले, तरी मृत रमेश मिसाळ हे भगतगिरी करतात आणि त्यामुळे सचिन व किरणचे वडील संतोष यांचा मृत्यू झाल्याचा संशय आरोपींना होता. त्यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली. याप्रकरणी सचिन मिसाळ, किरण मिसाळ, महेश मिसाळ, मीनाक्षी मिसाळ, राधिका मिसाळ, सुनंदा मिसाळ, योगिता मिसाळ या सातजणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०६, ३२४, ४५१, ५०६, ५०४, १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.