शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पर्यटकांचा सायकलवरून प्रवास; मुंबईतून देवगडात पाचव्या दिवशी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:42 IST

देवगडमधील निसर्ग पाहून व मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी अभिप्राय लिहिताना नमूद केले की, आतापर्यंतच्या प्रवासातील अतिशय सुुंदर स्थळे व सुंदर जेवण देवगडमध्येच मिळाले आहे.

ठळक मुद्देआरोग्य सुदृढ ठेवण्याचा दिला संदेश 

देवगड : देवगड येथे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर व देवगड बीचवर पर्यटकांची वर्दळ वाढू  लागली आहे. इंग्लंड येथील परदेशी ५० पर्यटक मुंबईतून सायकलवरून प्रवास करीत सोमवारी ५व्या दिवशी देवगड येथील हॉटेल डायमंड येथे दाखल झाले आहेत. सायकलवरून प्रवास करून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी संदेश देत आहेत.

देवगडमधील निसर्ग पाहून व मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी अभिप्राय लिहिताना नमूद केले की, आतापर्यंतच्या प्रवासातील अतिशय सुुंदर स्थळे व सुंदर जेवण देवगडमध्येच मिळाले आहे.

देवगड तालुक्यामध्ये अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. गेल्या पाच वर्षांत देवगडमधील पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून विकास होऊन देशी पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटकांचा ओढा देवगडकडे वाढू लागला आहे. 

इंग्लंडमधील पर्यटक मुंबईवरून पाच दिवसांचा सायकलवरून प्रवास करीत देवगड येथे सोमवारी दाखल झाले. सायकल चालवून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश देत त्यांनी येथील पर्यटनाबरोबर मालवणी जेवणाची तोंड भरून स्तुती केली. 

५० परदेशी पर्यटक या टिममध्ये असून ते मुंबई ते गोवा असा  सायकलने प्रवास करीत आहेत. हे पर्यटक देवगडमध्ये दाखल झाल्यानंतर  सुप्रसिद्ध हॉटेल डायमंड येथे मालवणी जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला. त्यानंतर ते मालवणमार्गे गोव्याच्या दिशेने सायकल प्रवास करीत रवाना झाले आहेत. पर्यटकांना चांगली सेवा दिल्याबद्दल डायमंड हॉटेलचे मालक गौरव पारकर यांचे पर्यटकांनी कौतुक केले.

 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbycycle rallyसायकल रॅली