शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतही अभियंत्याचे उपोषण सुरुच

By admin | Updated: January 29, 2015 23:40 IST

जिल्हा प्रशासनाकडून चौथ्या दिवशीही दखल नाहीच

रत्नागिरी : सेवेतून बेकायदेशीररित्या कमी केल्याने न्याय मिळावा, यासाठी देवरूख येथील अभियंता राजेंद्र चव्हाण यांचे कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरूच आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन मात्र, या उपोषणाबाबत बेदखल असल्याचे दाखवत आहे.देवरूख येथील राजेंद्र धर्माजी चव्हाण यांना मुदतीत शैक्षणिक अर्हता संपादन केली नसल्याच्या कारणावरून १९८८ च्या सुमारास जिल्हा परिषदेकडून अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. याबाबत त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरीही उमेद न घालवता चव्हाण यांनी कधी पत्रव्यवहार, अर्ज -विनंत्या तर कधी उपोषण करून दाद मिळविण्याचा प्रयत्न केला.याबाबत आठ महिन्यापुर्वीच शासनाने नवीन अध्यादेश काढला. त्यानुसार अशा व्यक्तींना सेवेतून कमी न करता त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, असे नमूद करण्यात आले होते. अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेलाही पाठविण्यात आले होते. त्यानंतरही चव्हाण यांना दिलासा वाटल्याने त्यांनी पुन्हा सातत्याने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचा आडमुठेपणा कायम राहिला, असे उपोषणकर्त्या चव्हाणांचे म्हणणे आहे.सेवेतून कमी करण्यात आल्याने सुमारे २७ वर्षे चव्हाण यांना बेरोजगारीचा व इतर अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अद्याप त्यांना जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागले आहे. २६ जानेवारीपासून अभियंता चव्हाण यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. कडाक्याच्या थंडीतही ते उपोषणाच्या ठिकाणी दिवसरात्र असूनही, याची दखल जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घ्यावीशी वाटत नाही. याबाबत आपल्याला न्याय मिळाला नाहीच तर आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे राजेंद्र धर्माजी चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)