शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अकरा कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

प्रसन्ना कुबल : वेंगुर्ले शहरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहराला २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी व निशाण तलावाची उंची वाढविण्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेला ५ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शासनाने नगरोत्सवमधून २ कोटी ७५ लाख रुपयांची १३ कामे मंजूर केली आहेत. तसेच मच्छिमार्केटच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असल्याचेही यावेळी कुबल यांनी सांगितले. शहरात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी पणनमंत्री, पाणी पुरवठा मंत्री, पाणी पुरवठा अभियंता यांच्याशी सातत्याने आपण संपर्क ठेवून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. वेंगुर्ले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशान तलावाची उंची अडीच मिटरने वाढविण्यासाठी शासनाने निशाण तलावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ५ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना २४ तास मुबलक पाणी मिळू शकेल, असे कुबल यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले मच्छिमार्केटच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्योद्योग विभागाकडून मत्स्योद्योग पायाभूूत योजनेंतर्गत अडीच कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती कुबल यांनी दिली. नगरपरिषदेच्या बाजारपेठेतील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटला असून आता समिती स्थापन करून भाडे ठरविणार असल्याचे कुबल यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आपण तसेच उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळूसकर, पद्मिनी सावंत, सुषमा प्रभूखानोलकर, नीला भागवत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक नाईक, शहराध्यक्ष सचिन वालावलकर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बबन नार्वेकर यांनी भेट देऊन शहरीकरणासाठी निधीची मागणी केली असल्याचे कुबल यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळूसकर, सुषमा प्रभूखानोलकर, नीला भागवत उपस्थित होते. (प्रतिनिधी) नगरोत्सव योजनेतून पावणेतीन कोटीमहाराष्ट्र शासनाच्या नगरोत्सव योजनेमधून पावणेतीन कोटी रुपयांची शहरातील १३ कामे मंजूर झाली असल्याची माहिती कुबल यांनी दिली. शहरातील कचरा उचलण्यासाठी व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी माजी आमदार केसरकर यांनी एक घंटागाडी खरेदीसाठी तर राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी एक घंटागाडी दिली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी डास निर्मूलनासाठी साडेचार लाख रुपयांचे डास निर्मूलन फवारणी मशीन दिले आहे. भाजपाच्या नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांच्या प्रयत्नातून भाजपाचे आमदार रामनाथ मोटे यांनी एक घंटागाडीसाठी निधी देण्याचा शब्द दिल्याची माहिती कुबल यांनी दिली.