शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

ओरोसच्या डॉन बॉस्कोला अजिंक्यपद

By admin | Updated: January 9, 2015 00:04 IST

राष्ट्रीय स्काऊट गाईड : महाराष्ट्रातील अनेक संघ सहभागी

ओरोस : तंजावर (तामिळनाडू) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट-गाईडच्या बॉस्केरी कॅम्पमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याने आपला ठसा उमटविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसच्या डॉन बॉस्को स्कूलने सर्वसाधारण अजिंक्यपदाचा बहुमान पटकावला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह अनेक संघ सहभागी झाले होते.तामिळनाडू येथील तंजावर मॅट्रीक्युलेशन डॉन बॉस्को ग्राऊंडवर राष्ट्रीय बॉस्कोरी स्काऊट-गाईड कॅम्पमध्ये आसाम, मिझोराम, सिक्कीम, तामिळनाडू, मणिपूर, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवासह महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग यांसह अनेक राज्यांच्या संघांचा समावेश होता. ४ हजार ५०० विद्यार्थी या शिबिरासाठी सहभागी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. तंजावर येथील राष्ट्रीय स्काऊट- गाईड कॅम्पमध्ये पायनरींग, कॅम्पफायर, मार्क पास, रांगोळी, पेन्टींग, शोभायात्रा, हॅण्डग्राफी डिस्प्ले, साहसी खेळ, कलर पार्टी, बिनभांडे स्वयंपाक, पेन्ट बनविणे अशा प्रात्यक्षिकांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. देशातून ९ बॉस्कोरी विनर काढले. त्यात ओरोसच्या डॉन बॉस्कोच्या ६५ विद्यार्थ्यांसोबत फादर क्लाईव्ह टेलीस, रोहिदास राणे, स्काऊट टिचर प्रमिला परब, कल्पना हरमळकर, गाईड कॅप्टन ब्रदर मेल्टन बरेटो सहभागी झाले होते. दोन वर्षांपूर्वी गोवा येथेही डॉन बॉस्कोने पहिला क्रमांक मिळविला. (वार्ताहर)टोप्यांचे गिनीज रेकॉर्डबॉस्कोरी कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये ४ हजार कागदी टोप्या बनविण्याचा विक्रम केला. चार वर्षात कॅम्पमध्ये ३ हजार ५०० कागदी टोप्या बनविल्या. त्यात विद्यार्थ्यांनी ४ हजार टोप्या बनविण्याचा विक्रम करून पंचांच्या मूल्यमापनात मानाचे स्थान पटकाविल्याने पंचांनी याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविली. विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन तसेच प्रमाणपत्र देण्याचे निश्चित केले आहे.