शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रोको आंदोलन करणार

By admin | Updated: September 7, 2014 23:19 IST

शिवसेनेचा इशारा : कणकवलीतील स्टेशनमास्तरांना निवेदन

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस बंद करून त्या गाडीच्या वेळेप्रमाणे डबलडेकर सोडण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यास शिवसेनेच्यावतीने रेल्वे रेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन रविवारी रेल्वे स्टेशन मास्तरांकडे सादर करण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, जनशताब्दी एक्स्प्रेसचे तिकीट दर डबलडेकर गाडीच्या तुलनेत खूपच कमी आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे हे तिकीटदर आहेत. प्रवाशांची संख्या पाहता जादा गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. याला सिंधुदुर्ग युवा सेनेचा तीव्र विरोध आहे.कोणत्याही परिस्थितीत कोकण रेल्वे मार्गावरील एकही गाडी बंद करू नये. नव्याने सुरु केलेली डबलडेकर गाडी नियमित करून तिचे तिकीट दरही कमी करावेत. रेल्वे तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक रेल्वेमध्ये महिला व पुरुष सुरक्षा रक्षक नेमावेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने सुरक्षा यंत्रणेला संपर्क करण्यासाठी विशेष संपर्क क्रमांकही सुरु करण्यात यावेत. या मागण्यांची रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास शिवसेना खासदार विनायक राऊत व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेतर्फे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर व मार्गावर रेलरोको आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, रविवारी येथील रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरना युवा सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, अजित काणेकर, रिमेश चव्हाण, अमित लोखंडे, शहरप्रमुख मंदार सोगम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)