शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

चांगले काम करा, आम्ही सोबत, देवेंद्र फडणवीस यांनी दिला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:58 IST

सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत आलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत ह्यचांगले काम करा, आम्ही सोबत आहोतह्ण असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी फडणवीस यांच्याकडे नगरपालिकेला निधी मिळावा यासाठी निवेदन सादर केले. त्यावर निधी देण्याचे फडणवीस यांनी मान्य केले.

ठळक मुद्देचांगले काम करा, आम्ही सोबत, देवेंद्र फडणवीस यांनी दिला विश्वास सावंतवाडीत विरोधी पक्षनेत्यांचे जंगी स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत आलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत ह्यचांगले काम करा, आम्ही सोबत आहोतह्ण असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी फडणवीस यांच्याकडे नगरपालिकेला निधी मिळावा यासाठी निवेदन सादर केले. त्यावर निधी देण्याचे फडणवीस यांनी मान्य केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सिंधुदुर्गमध्ये आले होते. ते सोमवारी गोवामार्गे मुंबईला जात होते. मात्र, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संंजू परब यांंनी आग्रह केल्यानंतर ते काही मिनिटांसाठी सावंतवाडीत आले होते. त्यांचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाई गिरकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नीतेश राणे उपस्थित होते.

यावेळी सभापती मानसी धुुरी, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, अ‍ॅड. परिमल नाईक, पुखराज पुरोेहित, मंडल अध्यक्ष संदीप गावडे, महेश धुरी, अजय गोंदावले, विनोद सावंत, श्रीपाद चोडणकर, अजय सावंत, केतन आजगावकर, गुरू मठकर, अमित परब, हेमंत बांदेकर, बेला पिंटो, परिणिती वर्तक, दीप्ती माटेकर, धनश्री गावकर, आदींनी फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक यांंच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्तही सावंतवाडीत तैनात केला होता. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी विकासकामांबाबत निवेदने दिली. त्यावर निश्चित विचार करू असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी पालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा

सावंतवाडी नगरपालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकविण्यात यश आले आहे. निवडणूक होऊन सात महिने पूर्ण झाले आहेत. या काळात प्रथमच सावंतवाडीला भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सुरुवातीला त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देणार असे जाहीर केले होते.

नंतर मालवण येथे प्रवेशाचा कार्यक्रम असल्याने वेळ झाल्याने अखेर सावंतवाडी शहराला धावती भेट देण्याचे त्यांनी मान्य केले. नगराध्यक्ष संंजू परब यांनी खास आग्रह करीत फडणवीस यांनी सावंतवाडीला तरी भेट द्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ते सावंतवाडी शहरात आले होते.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsindhudurgसिंधुदुर्ग