शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना ‘हँँडग्लोव्हज्-मास्क’चे वितरण

By admin | Updated: June 16, 2016 01:19 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : कामगारांना आरोग्याच्यादृष्टीने साधने वापरण्यास बंधनकारक करा

मालवण : पालिका हद्दीतील कचरा उचलण्यासाठी कार्यरत असलेल्या सफाई कामगार हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरत नसल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदारांनी सफाई कामगारांना हँडग्लोव्हज् आणि मास्क तसेच रेनकोट उपलब्ध करून दिला आहे. सफाई कामगार उघड्या हातांनी दुर्गंधीयुक्त ओला कचरा भरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता.पावसाळी हंगामात सफाई कामगारांना दुर्गंधीयुक्त ओला कचरा उचलणे जिकरीचे असते. त्यातच ते पोटासाठी ते काम करतात. मात्र त्यांना देण्यात येणारे हँडग्लोव्हज् आणि मास्क हे कर्मचारी नियमित वापरात नाहीत. ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वर्षातून चार ते पाच वेळा हँडग्लोव्हज् आणि मास्क देण्यात येतात. असे असताना कामगारांना हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरण्याच्या सूचना केल्यास ते काम सोडण्याच्या तयारीत असतात. कामगारांनी काम सोडले तर मजूर मिळणे कठीण असते, असे ठेकेदाराने सांगितले.पालिकेकडून जागृती व्हावीशहरात वाढलेले कचऱ्याचे ढीग उचलताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. त्या कर्मचाऱ्यांसाठी तो कामाचा भाग असला तरी कुजलेला ओला तसेच दुर्गंधीयुक्त कचरा उचलताना या कर्मचाऱ्यांची परवड होते. कर्मचाऱ्यांकडे असलेले हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरून जीर्ण होतात. पावसाळी स्थितीत अशा फाटलेल्या भागातून साथरोग व संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची भीती असते. यामुळे कर्मचारी सूचना पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई न करता जागृती करणे आवश्यक आहे. सफाई कामगार कचरा उचलत असताना सामान्य नागरिकालाही ते पहावणार नसते. त्यामुळे पालिकेने कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. तसेच हँडग्लोव्हज् आणि मास्क ही साधने नियमित वापरण्यास बंधनकारक असल्याचे नगरसेवक नितीन वाळके यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)हँडग्लोव्हज्, मास्कचा वापर करापावसाळ्यात किंवा अन्य ऋतूत सफाई कामगार कचरा उचलण्याचे काम करत असतो. अशावेळी तो जणू आरोग्याशी खेळत असतो. पात्र चरितार्थ चालावा यासाठी तो हे काम करत असतो. त्यामुळे स्वच्छताविषयक काम करताना आरोग्याची काळजी कर्मचारी वर्गाने घेणे आवश्यक आहे. हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरल्यास बऱ्यापैकी आरोग्यावर नियंत्रण राहू शकते. तसेच पावसाळ्यात साथरोग पसरण्याची दाट शक्यता असल्याने भविष्याच्यादृष्टीने साधने वापरणे अनिवार्य आहेत.