शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती मनावर बिंबवणे गरजेचे

By admin | Updated: December 25, 2014 00:12 IST

जीवन कांबळे : ओंबळ येथे पारितोषिक वितरण समारंभ

शिरगाव : गाव तंटामुक्त झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही तर ती आता खऱ्या अर्थाने वाढली आहे. तंटामुक्त गाव कसा ठेवायचा हे प्रत्येक ग्रामस्थांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. लोकसहभाग, सामोपचार व प्रशासनाचे सहकार्य घेऊन ओंबळ गाव तंटामुक्त झाला हे यश कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार देवगड तहसीलदार जीवन कांबळे यांनी ओंबळ येथे काढले.ओंबळ ग्रामपंचायतीस सन २०१०-११ या कालावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गावाचे शासनाचे पारितोषिक मिळाले होते. पारितोषिक वितरण समारंभ जीवन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी योजनेची माहिती, तंटामुक्ती समितीची भूमिका, ग्रामस्थांचे सहकार्य व शासनाचा या योजनेविषयीच्या उद्देशाविषयी मार्गदर्शन केले.व्यसनमुक्त कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविलेल्या ग्रामस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिरगाव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार कदम सत्काराला उत्तर देताना म्हणाले, जननी, जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे. जन्मभूमीत माझ्या ग्रामस्थांनी केलेला सत्कार अवर्णनीय आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीच्या वज्रमुठीमुळेच गाव तंटामुक्त झाला. ही एकीची वज्रमुठ कायम ठेवा. स्पर्धा परीक्षांमध्येही गावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवावे, यासाठी ध्येयासक्ती अनंत असावी. तंटामुक्ती समितीध्यक्ष राजनकुमार कदम म्हणाले, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच तंटामुक्त समितीला हे नेत्रदीपक यश मिळाले, याचा सार्थ अभिमान वाटतो.यावेळी सरपंच माधुरी ओंबळकर, तलाठी जे. एस. साईल, शामसुंदर जाधव, पोलीस पाटील संजय पवार, कृषीसेवक चित्रा सारंग, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेस्त्री, विरेंद्र पवार, प्रज्ञा पवार, ग्रामसेवक व्ही. एम. मलगुंडे, शिरगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश लोके, निमंत्रक चंद्रशेखर साटम, माजी सरपंच भालचंद्र धुमाळ, माजी पोलीस पाटील शरद पवार, विठ्ठल गावडे, अरूण पवार, अनिल पवार, सुप्रिया कदम, कामगार कल्याण अधिकारी प्रभाकर जाधव, नाद पोलीस पाटील विजय तांबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संभाजी पाटील यांनी केले. आभार राजन कदम यांनी मानले. (प्रतिनिधी)