शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय शिरोडकरांचा जनआंदोलनाचा इशारा

By admin | Updated: September 11, 2014 00:01 IST

सातार्डा तपासणी नाक्यावर असभ्य वागणूक

शिरोडा : महाराष्ट्र- गोवा सीमेवरील सातार्डा चेक पोस्टवर पोलिसांकडून जनतेशी असभ्य व्यवहार होत आहे. मनसेचे शिरोडा शाखाध्यक्ष धनंजय शिरोडकर यांनाही पोलिसांच्या असभ्य वर्तनाची झलक पहावयास मिळाल्याने त्यांनी या पोलिसांकडून जनतेला योग्य वागणूक न मिळाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.याबाबत धनंजय शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय शिरोडकर व त्यांचा मित्र स्वप्निल कुडव काम करत असलेल्या गोवा येथील कंपनीतून रात्री माघारी येत असता, सातार्डा चेक पोस्टवर थांबा घातलेला असल्याने मोटारसायकल थांबविली. यावेळी रात्रपाळीसाठी असलेला पोलीस कर्मचारी त्या दोघांना उद्देशून असभ्य भाषेत बोलत होता. शिरोडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडे लक्ष न देता थांबा वर करण्याची विनंती केली. परंतु तो पोलीस कर्मचारी जास्तच अडवणूक करू लागला. त्यानंतर बऱ्याचवेळाने त्याने थांबा वर केला. जनतेच्या रक्षणासाठी व संरक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांकडून जनता चांगल्या वागण्याची अपेक्षा करते. मात्र, काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या असभ्य वागण्याने जनता पोलिसांना नावे ठेवत आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे शिरोडा मनसेचे शाखाध्यक्ष धनंजय शिरोडकर यांनी सांगतानाच सातार्डा चेकपोस्टवर सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.तसेच पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीला वेळीच न रोखल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)तपासणी नाक्यांवर खाकीकडून दमदाटीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तपासणी नाक्यांवरील काही कर्मचारी हे प्रवाशांबरोबर अशाप्रकारचे असभ्य वर्तन करत असल्याच्या घटना वारंवार उघड होत आहेत. मात्र, त्या -त्यावेळी प्रवाशी याबाबत आवाज उठवत नाहीत. त्यामुळे खाकीमधील अशा काही कर्मचाऱ्यांमुळे पूर्ण वर्दीची प्रतिमा डागाळत आहे, असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.