शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू साथरोगाची झळ जिल्ह्याला

By admin | Updated: November 9, 2014 23:28 IST

आरोग्य विभाग : योग्य काळजी घेतल्यास मात करणे शक्य

सिंधुदुर्गनगरी : राज्यात डेंग्यूने थैमान मांडले असून कित्येकांचे बळीही घेतले आहेत. या साथरोगाची झळ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही काही प्रमाणात बसत आहे. डेंग्यू हा नेमका कसा होतो? त्याची लक्षणे कोणती? तसेच या डेंग्यूचा नायनाट कसा करता येईल याबाबतची माहिती देण्यात आली असून योग्य काळजी घेतल्यास डेंग्यूवर मात करू शकतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. डेंग्यूचा उपद्रव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील का या संदर्भात जिल्हा आरोग्य विभागाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव सोडल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारीत केला जातो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग (आजार) दोन प्रकारे होतो. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू एडीस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास दिवसाचा चावा घेतात अशी माहिती डॉ. सोडल यांनी दिली.डेंग्यू तापलहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येवू शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.डेंग्यू अतिगंभीर आजारही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होेणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.प्रतिबंधडासांना आळा घालणे हा एकमेव उपाय. रोगाला पसरवण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे, डासांना प्रतिबंध घालू शकतात.औषधोपचारताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये. तत्काळ डॉक्टरजवळ जाणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून जलपेयाचा भरपूर उपयोग करावा. ताप उतरत नसल्यास किंवा वरील लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे अशी माहिती डॉ. नामदेव सोडल यांनी दिली. (प्रतिनिधी)डेंग्यू रक्तस्त्रावात्मक तापहा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्त्राव, चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव तसेच अंतर्गत रक्तस्त्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे तीव्र, सतत पोटदुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे आदी लक्षणे आढळून येतात.