Sindhudurg: गुरु पौर्णिमेच्या दिवशीच दत्तमूर्ती सापडली, जानवली येथील मंदिरातून गेलेली चोरीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:29 IST2025-07-10T12:26:38+5:302025-07-10T12:29:06+5:30
कणकवली : जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून शनिवारी (दि.५) पहाटे चोरीस गेलेली श्री दत्तमूर्ती आज, गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या ...

Sindhudurg: गुरु पौर्णिमेच्या दिवशीच दत्तमूर्ती सापडली, जानवली येथील मंदिरातून गेलेली चोरीस
कणकवली : जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून शनिवारी (दि.५) पहाटे चोरीस गेलेली श्री दत्तमूर्ती आज, गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सापडली. कृष्णानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिशवीवर दत्तमूर्ती आढळून आली. कृष्णा नगरीच्या वॉचमनने याबाबत पोलिसांना माहिती देताच कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत. पंचनामा करत मूर्ती ताब्यात घेण्यात आली.
वाचा- चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैद
आज, गुरुवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास हायवेवरून कृष्णानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एका पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत ही मूर्ती वॉचमनला दिसून आली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ या तसेच फॉरेन्सिक अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मूर्तीची पाहणी केली व त्यानंतर पंचनामा करून मूर्ती ताब्यात घेण्यात आली आहे.
दरम्यान ही मूर्ती या ठिकाणी कशी आणून ठेवण्यात आली, ती कोणत्या वाहनाने आणण्यात आली याबाबतचा तपास सुरू करण्यात आला होता.