शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Sindhudurg : आरोग्य सेवेत सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 15:56 IST

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या काळात पूर्णतः कोलमडली असून, त्याविरोधात कणकवली तालुका भाजपच्यावतीने सरकार, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांचे ...

ठळक मुद्देआरोग्य सेवेत सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार कणकवली भाजपाचा इशारा ; उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लक्षवेध आंदोलन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या काळात पूर्णतः कोलमडली असून, त्याविरोधात कणकवली तालुका भाजपच्यावतीने सरकार, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. हे आंदोलन प्राथमिक स्वरूपाचे असून, जर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन भाजपकडून उभारण्यात येईल, असा इशारा भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे व मिलिंद मेस्त्री यांनी दिला.कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या लक्षवेध आंदोलनात तालुकाध्यक्ष संतोष कानडे , मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, माजी सभापती प्रज्ञा ढवण, सोनू सावंत, महेश गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, शिशिर परुळेकर, कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, समीर प्रभुगावकर, सदा चव्हाण, संतोष पुजारे, भाजपा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, नितीन पाडावे, समर्थ राणे, अजय घाडी, बाळा पाटील आदी उपस्थित होते.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.सात महिने पगार नसतील तर काय कामाचे ?यावेळी ''पालकमंत्री हाय, हाय, या पालकमंत्र्यांचा करायचे काय?, आघाडी सरकारचा निषेध असो'' , अशा अनेक घोषणा देत पालकमंत्री व राज्य सरकारचा भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. जिल्ह्यात भाजपाकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्यानंतर आतापर्यंत चार फिजिशियन दाखल झाले आहेत. मात्र आमचे आंदोलन हे तात्पुरते नाही तर दीर्घकाळ चालणार असून, जोपर्यंत आरोग्य व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत भाजपा मागे हटणार नाही असा इशारा कानडे व मेस्त्री यांनी दिला. आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांना वेळेत पगार हे दिलेच पाहिजेत. कोरोनाशी हे लोक दोन हात करत असताना त्यांना जर सात महिने पगार मिळत नसतील तर सरकार काय कामाचे ? असा सवाल कानडे यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग