शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: July 9, 2015 00:14 IST

भाजप पदाधिकारी आक्रमक : विकासकामे मंजूर होत नसल्याचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून सुचविलेली विकासकामे पाठपुरावा करूनही मंजूर होत नाहीत. मात्र, इतर पक्षाकडून दूरध्वनीवरून सांगितलेली विकासकामे मंजूर केली जातात. त्यामुळे अखेर बुधवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना घेराव घालत याबाबतचा जाब विचारला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता या प्रकरणी आपण बारकाईने लक्ष देऊन पुरवणी यादी ठेवून विकासकामे मंजुरीसाठी ठेवतो असे सांगत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शांत केले.जिल्हा नियोजनमधून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विकासात्मक कामे केली जातात. परंतु जिल्हा नियोजन विकास आराखड्यामध्ये भाजपचे प्रमोद जठार, अतुल काळसेकर, काका कुडाळकर आदी पदाधिकाऱ्यांनी काही विकासकामे सुचविली होती. मात्र दूरध्वनीवरून संपर्क करून सुचविलेली काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे विकासकामांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही कामे ठेकेदारांशी बसून निश्चित करण्यात आली आहेत असा आरोप भाजपच्या काका कुडाळकर व अतुल काळसेकर यांनी केला आहे.याबाबत बुधवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालत आमची कामे सुचवूनही का डावलण्यात आली याची कारणे द्या. कोणाच्या सांगण्यावरून कामे डावलली? आमचा हक्क का डावलला जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना धारेवर धरले. यावेळी नियोजन अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.पुरवणी यादीद्वारे विकासकामे मंजुरीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे जाणूनबुजून डावलण्यात आली आहेत. आमची कामे यादीत समाविष्ट केली नाहीत. अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. कामे का डावलली याचे नियमानुसार उत्तर द्या. तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आपण याबाबत स्वत: लक्ष घालून कोणावर अन्याय होऊ नये यासाठी आपली कामे मंजूर होण्याच्या दृष्टीने पुरवणी यादी नियोजन समिती सादर केली जाईल असे स्पष्ट करत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शांत केले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काका कुडाळकर, प्रज्ञा ढवण, प्रमोद रावराणे, बाळू देसाई, राजू राऊळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भ्रष्टाचाराची चौकशी कराजिल्हा नियोजनमधून दीड वर्षापूर्वी घेतलेली कामे पूर्ण झालेली असताना संबंधित कामांना पुन्हा निधी देऊन भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याची चौकशी करण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे