Sindhudurg: करुळ घाटात कार ६०० फूट खोल दरीत कोसळली, दोन प्रवाशांनी मारली बाहेर उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:15 IST2026-02-12T13:14:14+5:302026-02-12T13:15:12+5:30

अपघात की घातपात? तर्कवितर्कांना उधाण 

Car falls into 600 feet deep gorge in Karul Ghat, two passengers jump out | Sindhudurg: करुळ घाटात कार ६०० फूट खोल दरीत कोसळली, दोन प्रवाशांनी मारली बाहेर उडी

Sindhudurg: करुळ घाटात कार ६०० फूट खोल दरीत कोसळली, दोन प्रवाशांनी मारली बाहेर उडी

वैभववाडी : मृत्यू समोर उभा असताना नशिबाने साथ दिली, तर काय चमत्कार घडू शकतो याचा प्रत्यय करुळ घाटात आला. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील एक कार ६०० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, कार दरीत झेपावण्यापूर्वीच त्यातील दोघांनी बाहेर उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला असून दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

दिंडवणेपासून ५०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातातून बचावलेल्या दोघांनी स्वतः पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. वैभववाडी पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, 'सह्याद्री जीव रक्षक' पथकाने बुधवारी दरीत उतरून कारची पाहणी केली. मात्र, या घटनेची पोलिसांत अद्याप अधिकृत नोंद झालेली नाही.

अपघात की घातपात? तर्कवितर्कांना उधाण

ज्या ठिकाणावरून कार दरीत कोसळली, तिथे दोन्ही प्रवाशांना बाहेर उडी मारणे कसे शक्य झाले, असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींकडून उपस्थित केला जात आहे. अपघाताची सद्य:स्थिती आणि प्रवाशांचा बचाव यावरून स्थानिक नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण असून, हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सह्याद्री जीव रक्षक पथकाचा थरार

कार ६०० फूट खोल गेल्यामुळे ती रस्त्यावरून दिसत नव्हती. गाडीत आणखी कोणी अडकले आहे का, हे तपासण्यासाठी सह्याद्री जीव रक्षक पथकाचे सदस्य दोरखंडाच्या साहाय्याने खोल दरीत उतरले. कारमधील साहित्याची तपासणी केल्यानंतर त्यात अन्य कोणीही नसल्याची खात्री करण्यात आली.

Web Title : सिंधुदुर्ग: करुल घाट में कार 600 फीट गहरी खाई में गिरी, दो बचे।

Web Summary : सिंधुदुर्ग के करुल घाट में एक कार 600 फीट गहरी खाई में गिर गई। दो यात्री चमत्कारिक रूप से कूदकर बच गए। कार नष्ट हो गई, और घटना की जांच चल रही है।

Web Title : Sindhudurg: Car plunges 600 feet in Karul Ghat, two survive.

Web Summary : A car fell 600 feet into a valley in Karul Ghat, Sindhudurg. Two passengers miraculously survived by jumping out before the crash. The car was destroyed, and the incident is under investigation.