शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलधारकांना अधिक ‘शर्करा योग’

By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST

निवडणुकीवर डोळा : आता मिळणार ६०० ग्रॅम साखर

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना आॅगस्टमध्ये प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर उपलब्ध झाली आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने त्यात अधिक १०० ग्रॅम साखरेचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७३ हजार बीपीएलधारकांसाठी साखर अधिकच गोड होणार आहे.शासनाने यापूर्वी कितीही घोषणा केल्या तरी आतापर्यंत साखर, पामतेल, डाळ आदी वस्तू रेशनदुकानातून कधीच गायब झाल्या होत्या. त्यामुळे साखर सामान्यांकरिता कडू झाली होती. नाईलाजाने काळ्या बाजाराने ती खरेदी करावी लागत होती. मात्र, आता निवडणूक कालावधी जवळ आल्याने बीपीएलधारकांना जुलै महिन्यासाठी ५०० ग्रॅम साखर उपलब्ध झाली होती. त्याचे वितरण आॅगस्टमध्ये सुरू झाले आहे. जिल्ह्यासाठी एकूण १८०३ क्विंंटल साखरेचे नियतन मंजूर झाले होते. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर या प्रमाणात संबंधित रास्त दर धान्य दुकानातून १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो दराने वितरीत करण्यात येतआहे. मात्र, केशरी व शुभ्र शिधापत्रिकाधारकांना ही साखर कडूच होती.आगामी निवडणुका लक्षात घेऊन शासनाने आॅगस्टच्या नियतनामध्ये बीपीएलधारकांना आणखी १०० ग्रॅम साखर जादा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या महिन्याचे साखरेचे नियतन २३८५ क्विंटल इतके मंजूर झाले आहे. गेल्या महिन्यापेक्षा ५८५ क्विंटल इतकी वाढ या महिन्यात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बीपीएलधारकांसाठी निवडणुकीच्या निमित्ताने का होईना साखर अधिक गोड होणार आहे. साखर मिळाली असली तरी विविध कडधान्ये, पामतेल यांची अजूनही वानवा आहे. या वस्तू दुकानातून अव्वाच्या सव्वा दराने खरेदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे या वस्तूही शासनाने रास्त दर धान्य दुकानांवर उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)गणेशोत्सव होणार गोड...गणेशोत्सवात आता दारिद्र्यरेषेखालील जनतेला ५०० ग्रॅम साखर देण्याची घोषणा झाली. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा १०० ग्रॅम अधिक म्हणजे आता ६०० ग्रॅम साखर मिळेल.शासनाने यापूर्वी घोषणा केलेले साखर, पामतेल, डाळ आदी वस्तू सर्व रेशनदुकानांतून कधीच गायब झाल्या होत्या. साखर तर कडूच झाली होती. निवडणूक कालावधी जवळ आल्याने बीपीएलधारकांना ५०० ग्रॅम साखरेची घोषणा झाली. त्यानंतर काही दिवसांतच अधिक १०० ग्रॅम साखरेचा बोनसही जाहीर झाला आहे.