शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिले पाठवलेलीच नाहीत

By admin | Updated: March 1, 2015 23:15 IST

विधानसभा निवडणूक : निवडणूक शाखेकडून उपविभागीय कार्यालयांना नोटीस

रत्नागिरी : विधानसभा निवडणुका होऊन चार महिने उलटून गेले असले तरी अजूनही जिल्ह्यातील पाच उपविभागीय कार्यालयाकडून खर्चाची बिले निवडणूक शाखेकडे जमा करण्यात आलेली नाही. आता मार्च सुरू झाल्याने ही बिले आता लागलीच सादर केली नाहीत, तर मंजूर न झालेल्या बिलाची जबाबदारी संबंधित उपविभागीय कार्यालयांवर राहील, अशी नोटीस आता निवडणूक शाखेकडून या कार्यालयांना पाठवण्यात येणार आहे.आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या खर्चाची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या खर्चाचे अधिकार या पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या खर्चात प्रामुख्याने निवडणूक कर्मचारी भत्ता, मतदान जागृती अभियान, सीसीटीव्ही उपकरण, इंधन खर्च, छपाई, अतिकालिक भत्ता, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भोजन, प्रशिक्षण, मतमोजणी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी भत्ता, वाहतूक खर्च, इलेक्ट्रॉनिक मशीन, मतदान साहित्य आदी खर्चाचा समावेश आहे. यांपैकी काही बाबींच्या खर्चासाठी आगाऊ रक्कम निवडणूक विभागाकडून पाचही उपविभागीय कार्यालयांकडे देण्यात आली होती. तर काहींच्या खर्चाची रक्कम अद्याप देणे बाकी आहे. अजूनही निवडणुकीच्या कामगिरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे भत्ते मिळालेले नाहीत.तसेच काही इतर खर्चही अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी तसेच काही इतर व्यक्ती आपला झालेला खर्च कधी मिळतो, याची प्रतिक्षा करीत आहेत. मात्र, अजूनही बिलेच जिल्हा कार्यालयाकडे गेली नसल्याने खर्चाची रक्कम रखडली आहे.यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून वारंवार खर्चाची बिले सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे. मात्र, चार महिने उलटून गेले आहेत. तरी याबाबत अजूनही या कार्यालयांनी खर्चाची बिले अद्यापही जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेली नाहीत. आता मार्च महिना सुरू असल्याने हे आर्थिक वर्ष संपायला आले आहे. तरी अजूनही कुठल्याच उपविभागीय कार्यालयाला ही सर्व बिले पाठवण्याबाबत जाग आलेली नाही. त्यामुळे वारंवार तोंडी आणि त्यानंतर लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता मार्च संपण्यापूर्वी ही बिले सादर न झाल्यास झालेला खर्च मिळण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आता या खर्चाची बिले ज्या उपविभागीय कार्यालयांकडून येणार नाहीत, त्यांचा खर्च न मिळाल्यास ती जबाबदारी संबंधित कार्यालयावर राहील, अशी शेवटची नोटीस आता निवडणूक शाखेकडून पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (प्रतिनिधी)