शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी वाळूपट्ट्यांचे लिलाव करा, लिलावधारकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:00 IST

जिल्हा प्रशासनाकडून गतवर्षी वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया तब्बल सहा महिने रखडली होती. त्यामुळे लिलावधारकांना याचा फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. यावर्षी वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी करून वाळू व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मालवण तालुक्यातील वाळू लिलावधारक, वाळू उत्खनन संस्था, शासकीय बांधकाम ठेकेदार व डंपर मालक-चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेपूर्वी वाळूपट्ट्यांचे लिलाव करा, लिलावधारकांची मागणी गतवर्षी लिलाव रखडल्याने व्यावसायिकांचे झाले आर्थिक नुकसान

मालवण : जिल्हा प्रशासनाकडून गतवर्षी वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया तब्बल सहा महिने रखडली होती. त्यामुळे लिलावधारकांना याचा फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. यावर्षी वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी करून वाळू व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मालवण तालुक्यातील वाळू लिलावधारक, वाळू उत्खनन संस्था, शासकीय बांधकाम ठेकेदार व डंपर मालक-चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.वाळू पट्ट्यांचे लिलाव प्रक्रिया करण्याबाबत संबंधित संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, खनिकर्म विभागाचे अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षी लिलाव प्रक्रिया रखडल्याने ग्राहकांना वाळू पुरवठा करताना मोठी कसरत करावी लागली. परिणामी वाळू न मिळाल्याने अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत शिवाय लिलावधारकांचे सुद्धा फार मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे काही खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खननात वाढ झाली होती.यावर्षी वाळुपट्टे जाहीर करुन लवकरात लवकर वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून करण्यात यावी. पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसेच शासकीय स्तरावरून विकासकामांना मंजूरी देण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे वाळू पट्ट्यांचे लिलाव झाल्यास शासकीय कामांचा वेग वाढेल आणि लिलावधारकांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.वाळू उत्खनन करण्यास अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर अनधिकृत उत्खननास आळा बसणार आहे. त्यातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा प्रशासनाने वाळू पट्टे जाहीर करून वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्याची कार्यवाही आचारसंहितेपूर्वी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्ग