शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा बनाव रचून चुलत दिराकडून चैत्रालीचा घात

By अनंत खं.जाधव | Updated: December 11, 2023 23:44 IST

सावंतवाडीतील घटना : पोलिसांकडून चुलत दिर ताब्यात 

सावंतवाडी : दोन दिवसापूर्वी सावंतवाडीत घडलेल्या चैत्राली निलेश मेस्त्री या महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून ही आत्महत्या नसून तिचा खून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. हा खुन चैत्रालीचा चुलत दिर संदेश धोंडू मेस्त्री (19) यानेच केल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.दरम्यान हा खुन जेवण वाढण्यावरून झालेल्या वादावादी तून घडला असून कुणाला संशय येऊ नये म्हणून आरोपी संदेश याने चैत्रालीने आत्महत्या केल्याचे भासवले असल्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी मूळची मुळशी पुणे येथील चैत्राली मेस्त्री हिचा विवाह रत्नागिरी-खेड येथील निलेश मेस्त्री यांच्याशी झाला होता.बरीच वर्षे हि पती पत्नी मुळशी पुणे येथे राहत असत.निलेश हा सुतारकाम करत असे तर पत्नी चैत्राली ही मोलमंजुरी करत होती.मात्र कालांतराने पती पत्नी मध्ये वाद विवाद होत असल्याने त्याचा फायदा निलेश याच्या मावशीचा मुलगा संदेश धोडू मेस्त्री याने घेतला त्याची सतत चैत्राली राहत असलेल्या मुळशी येथील  घरी ये जा असायची यामुळे चैत्राली च्या घरातील नातेवाईक वैतागले त्यानी तुम्ही दुसरीकडे रहा असे सांगितले होते.

त्यातूनच चैत्राली ही चुलत दिर संदेश सोबत एक ते दिड महिन्या पूर्वी  कुणाला न सांगता बाहेर पडली त्याना पुण्यातून थेट गोवा गाठायचे होते..पण पैसे कमी असल्याने सावंतवाडीत थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला तसेच सावंतवाडी शहरातील सबनीवाडा भागात हि दोघे व चैत्रालीचा मुलगा असे तिघे मिळून भाड्याने घर घेऊन राहत होती.सावंतवाडी येथे वास्तव्य केल्यानंतर संदेश याला एका दुकानात काम मिळाले तर चैत्राली ही घरकाम करू लागली.

अशातच शनिवारी सुट्टी असल्याने संदेश याने घरी मासे व मटण आणून दिले व मी दुपारी येतो करून ठेव असे सांगितले.ठरल्याप्रमाणे चैताली हिने जेवण करून ठेवले व ती झोपी गेली बाहेर गेलेला संदेश हा घरी आल्यानंतर चैत्राली झोपी गेल्याचे बघून तो संतपला मला जेवण वाढ असे सांगून त्याच्या दोघात जोरदार बाचाबाची झाली त्यातच संदेश याने चैत्रालीचे डोके भिंतीवर आदळले त्यातच ती गतप्राण झाली.चैत्राली काहिच बोलत नाही म्हटल्यावर आता आपण पुरते अडकलो हे लक्षात आल्यावर तिच्या गळ्यावर फास अडकवून तिला वर टागले तरीही त्याला चैत्राली मृत पावल्याची खात्री पटत नव्हती म्हणून त्याने तिच्या पायाला गरम चटका दिला तेव्हा चैत्राली ने कोणताही प्रतिकार केला नसल्याने अखेर चैत्राली मृत पावली यांची संदेश ला खात्री झाली.

त्यानंतर मृतदेह खाली उतरवत 112 नंबर करून पोलिसांना बोलवले.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली त्यावेळी थोडाफार संशय आल्याने मृत चैत्रालीचा दिर संदेश याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरात विसंगती आढळून आल्याने अखेर सोमवारी सायंकाळी त्याला पोलिसांकडून रितसर अटक करण्यात आली.शवविच्छेदन कोल्हापूर सीपीआर येथे

चैत्राली हिच्या मृतदेहावर काही खुणा आढळून आल्याने पोलिसांकडून तिची उत्तरीय तपासणी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात  इन कॅमेरा करण्यात आली त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.मृत चैत्रालीच्या आईने दिली तक्रार 

आपल्या मुलीचा संदेश यानेच खुन केल्यावर चैत्रालीची आई लता गाडले ठाम होती.तिनेच पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनCrime Newsगुन्हेगारी