शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
4
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
5
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
6
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
7
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
8
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
9
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
10
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
11
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
12
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
13
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
14
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
15
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
16
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
17
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
18
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
19
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
20
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘गणपती पावला’, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:00 IST

गेल्या काही काळापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदआरोग्य विभागातील तब्बल ४३४ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ३१४ कार्यरत, तर १२० सेवानिवृत्त कर्मचारी समावेश आहे,  अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. या निर्णयाचा फायदा जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार असून, सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्यापासूनचा फरकदेखील त्यांना मिळणार आहे. आरोग्य पर्यवेक्षक (कार्यरत १६, सेवानिवृत्त १३, एकूण २९), आरोग्य सहायक (पुरुष)  कार्यरत ५५, सेवानिवृत्त १४, एकूण ६९, आरोग्यसेवक (पुरुष) कार्यरत १३१, सेवानिवृत्त १०, एकूण – १४१, आरोग्यसेवक (महिला) : कार्यरत ११२, सेवानिवृत्त ८३, एकूण १५५ एकूण लाभार्थी : ४३४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.गेल्या काही काळापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने सुधारित आदेश जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. वेतनश्रेणीतील फरक मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार असून, सणासुदीच्या खरेदीला गती मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांतून स्वागत करण्यात येत आहे.