शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: January 14, 2015 00:30 IST

मानव विकास योजना वाद : रास्तारोको आंदोलनानंतर तात्पुरता तोडगा

वैभववाडी : मानव विकास योजनेच्या एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकासमोर तासभर रास्तारोको आंदोलन केले. मानव विकासच्या बसमध्ये नको तर आम्हाला पर्यायी सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रकांकडे केली. पोलीस व संस्था पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर मानव विकासच्या एसटीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन तात्पुरता तोडगा काढण्यात आला.मानव विकासच्या बसेस बसस्थानकावर थांबवून न ठेवता कॉलेजच्या प्रांगणात आणाव्यात, या मागणीसाठी येथील हेमंत केशवराव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी बसस्थानकासमोर एसटी बस रोखली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना शांत करीत विद्यालयाच्या प्रांगणात एसटी बस न आणल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला होता. (प्रतिनिधी)एसटी ठरली कारणीभूतएसटी प्रशासनाकडून येथील वाहतूक नियंत्रक आणि शिक्षण संस्थांना मानव विकासच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन पत्र पाठविण्यात आले आहे. मानव विकासची एसटी सेवा फक्त मुलींसाठी असून विद्यार्थ्यांना त्या एसटी बसेसमधून प्रवास करता येणार नाही, असे महामंडळाने पत्रात म्हटले आहे. परंतु महामंडळाने गेली तीन वर्षे याच बसेसमधून विद्यार्थिनींसह विद्यार्थी व अन्य प्रवाशांची वाहतूक करून शासन निर्णय धाब्यावर बसवत स्वत:चा फायदा करून घेतला. मात्र मानव विकासच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारताना एसटी प्रशासनाने त्या वेळेत पासधारक विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले.पोलिसांच्या मध्यस्थीमुळेच तोडगाएसटी प्रशासनाकडून संस्थेला प्राप्त झालेल्या पत्रामुळे बसस्थानकावर विद्यार्थी गोंधळ घालणार, याची कल्पना आल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बसस्थानकात दाखल झाले. मात्र, वाहतूक नियंत्रक विद्यार्थ्यांच्या पर्यायी बसच्या मागणीची दखल घेत नसल्याचे लक्षात येताच बसस्थानकासमोर रास्तारोको केला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक नितीन कुंभार, वाहतूक पोलीस अनमोल रावराणे, संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक नियंत्रक बोडेकर यांना फैलावर घेत त्यांच्या वरिष्ठांशी दूरध्वनीवर कानउघडणी केली. त्यानंतर मानव विकासच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन आंदोलनावर तोडगा काढला. ..तर पुन्हा आंदोलनमानव विकासच्या बस विद्यालयाच्या प्रांगणातून सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी आंदोलन झाले. तर या बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी मंगळवारी रास्तारोको केला. त्यामुळे मानव विकासच्या बसेस रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून सोडणे आणि त्या बसमधून विद्यार्थ्यांना प्रवासबंदी केली तर पर्यायी एसटी सेवा त्याचवेळेत उपलब्ध करणे या मागण्यांबाबत एसटी प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉलेज व्यवस्थापनाने महामंडळाला दिला आहे.उशिरा सुचलेले शहाणपणमानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘गाव ते शाळा’ या उपक्रमाद्वारे बारावीपर्यंत या मुलींना मोफत प्रवास योजना २०१२ मध्ये सुरू केली. त्यासाठी शासनाने ५ बसेस वैभववाडी तालुक्यासाठी एसटी महामंडळाच्या ताब्यात दिल्या. त्यांच्या देखभाल व इंधनासाठी दरवर्षी ५ लाख रूपये शासन महामंडळाला देते. मात्र मुलींसाठी असलेल्या मानव विकासच्या एसटी बसेसचा महामंडळाला लाभ व्हावा, या हेतूने मुलींसह अन्य प्रवाशांची तीन वर्षे वाहतूक केली.