शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनात सकारात्मक ऊर्जा गरजेची

By admin | Updated: July 2, 2015 00:29 IST

ई. रवींद्रन : सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप समारंभ

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनात काम करताना सकारात्मक ऊर्जा अंगी असावी लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद अथवा जिल्हाधिकारी या कार्यक्षेत्रात काम करताना सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करू शकलो, असे मत माजी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी व्यक्त केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात माजी जिल्हाधिकारी यांचा निरोप समारंभ व नूतन अधिकारी यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात माजी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त, जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, कुडाळ प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, कणकवली प्रांताधिकारी संतोष भिसे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ई. रवींद्रन म्हणाले, प्रशासनात काम करण्यारसाठी काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. कोणतीही व्यक्तिगत भावना त्यापाठीमागे नसते. सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येतो. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव निश्चित पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील. सर्व एकत्र आल्यामुळे चांगले काम करता आले. यापुढेही नूतन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही आपली अशीच साथ लाभेल अशी आशा व्यक्त करतो.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले की, इंग्रजी पर्यटन वेबसाईट, कॉफी टेबल बुक, पर्यटन महोत्सव, लोकसभा व विधानसभा निवडणुका, महसूल विभागात केलेले बदल, तलाठी भरती प्रक्रिया, विविध बढती प्रक्रिया माजी जिल्हाधिकारी यांच्या कालावधीत मार्गी लागल्या. त्यांची निर्णय घेण्याची पद्धत अत्यंत चांगली होती, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)सूचनांचा अभ्यास करू : भंडारीजिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, गेले पाच दिवस माजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत आहे. त्यांनी आम्हाला जिल्ह्याविषयी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न व त्या अनुषंगाने माजी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी केलेल्या सूचना नक्कीच लक्षात ठेवून त्याप्रमाणे काम करू. रवींद्रन यांच्याप्रमाणे काम करू : शेखर सिंहमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले, माजी जिल्हाधिकारी यांनी एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्यांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत नक्कीच प्रेरणा देणारी आहे. मी त्यांच्या कामामुळे प्रभावित झालो आहे.