शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात कारवाई : पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

धिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

मडगाव : खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यानंतर गोव्यात पळून आलेल्या फैक मुश्ताक अहमद करंबेळकर (वय ३५) याच्या मडगाव पोलिसांनी काल, गुरुवारी रात्री मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक स्विफ्ट कार, एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. पिस्तुलावर सेड पिस्तूल अँड बेनेटा, मेड इन युएसए असा उल्लेख आहे. करंबेळकर याच्याविरुद्ध शस्त्र कायदा १९५९ च्या कलम ३ व २५ नुसार मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.करंबेळकर हा रत्नागिरीतील मिल्लतनगर, शिवाजीनगर येथील रहिवाशी आहे. गेले दीड वर्षे तो नागमोडे - नावेली येथे भाडयाच्या घरात राहत होता. कालकोंडा येथील आवलेथ येथे संशयिताचा गेले अनेक दिवस वावर होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. ही व्यक्ती वारंवार मोबाईलवरून कुणाशी तरी बोलत असायची, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या संशयाने पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीस खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी खरी माहिती सांगितली.नागमोडे येथे फेलिना कॉस्तांसियो रुझारियो कुलासो या महिलेच्या घरात तो भाडेकरू म्हणून रहात होता. भाडेकरू ठेवताना ‘सी’ फॉर्म भरुन भाडेकरूविषयी संपूर्ण माहिती पोलिसांना कळविणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र, या घरमालकीणीने ती तसदी घेतली नव्हती. या घरमालकीणीवरही आता कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.करंबेळकर याच्याकडे (एमएच 0२ एयू ३४९५) असणारी स्विफ्ट कार जप्त केली असून, सदर कार मुंबई येथील नारायण पसारे यांच्या नावावर असल्याचे तपासात आढळून आले आहे. रत्नागिरीत व्यवसाय असून, तेथे स्वत:ची तीन दुकाने असल्याचे सांगताना मडगावात आपण पॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करीत होतो, असेही हा संशयित पोलिसांना सांगत आहे. अटक करताना त्याच्या अंगावर सोन्याचे दागिनेही होते. मडगाव भागातील एका सोनाराकडून आपण हे दागिने करून घेतले होते, असे त्याने सांगितले असून, खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी या सोनाराला बोलावून घेतले आहे.जप्त केलेले पिस्तूल हे राजकुमार उके याच्याकडून घेतल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. उके याला एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो तुरुंगात आहे. सायन कोळीवाडा येथे करंबेळकर याचे काही मित्र आहेत. त्याने विशाल आमकर, अनिल आमकर, संदीप पवार व राजकुमार उके अशी काही नावे पोलिसांना सांगितली आहेत. यासंबधीची माहिती महाराष्ट्र व मुंबई पोलिसांनाही कळविली आहे. लवकरच तेथील पोलिसांचे एक पथक मडगावात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये व मडगाव एलआयबी पोलीस पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कमलाकार कोठारकर, हवालदार सावळो नाईक ऊर्फ एमआरफ, सुभाष नाईक, शेखर राऊत व विकास कौशिक यांनी केली. (प्रतिनिधी)मडगावात कारवाई : पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्तमडगाव : खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यानंतर गोव्यात पळून आलेल्या फैक मुश्ताक अहमद करंबेळकर (वय ३५) याच्या मडगाव पोलिसांनी काल, गुरुवारी रात्री मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक स्विफ्ट कार, एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. पिस्तुलावर सेड पिस्तूल अँड बेनेटा, मेड इन युएसए असा उल्लेख आहे. करंबेळकर याच्याविरुद्ध शस्त्र कायदा १९५९ च्या कलम ३ व २५ नुसार मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.करंबेळकर हा रत्नागिरीतील मिल्लतनगर, शिवाजीनगर येथील रहिवाशी आहे. गेले दीड वर्षे तो नागमोडे - नावेली येथे भाडयाच्या घरात राहत होता. कालकोंडा येथील आवलेथ येथे संशयिताचा गेले अनेक दिवस वावर होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. ही व्यक्ती वारंवार मोबाईलवरून कुणाशी तरी बोलत असायची, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या संशयाने पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीस खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी खरी माहिती सांगितली.नागमोडे येथे फेलिना कॉस्तांसियो रुझारियो कुलासो या महिलेच्या घरात तो भाडेकरू म्हणून रहात होता. भाडेकरू ठेवताना ‘सी’ फॉर्म भरुन भाडेकरूविषयी संपूर्ण माहिती पोलिसांना कळविणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र, या घरमालकीणीने ती तसदी घेतली नव्हती. या घरमालकीणीवरही आता कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.करंबेळकर याच्याकडे (एमएच 0२ एयू ३४९५) असणारी स्विफ्ट कार जप्त केली असून, सदर कार मुंबई येथील नारायण पसारे यांच्या नावावर असल्याचे तपासात आढळून आले आहे. रत्नागिरीत व्यवसाय असून, तेथे स्वत:ची तीन दुकाने असल्याचे सांगताना मडगावात आपण पॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करीत होतो, असेही हा संशयित पोलिसांना सांगत आहे. अटक करताना त्याच्या अंगावर सोन्याचे दागिनेही होते. मडगाव भागातील एका सोनाराकडून आपण हे दागिने करून घेतले होते, असे त्याने सांगितले असून, खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी या सोनाराला बोलावून घेतले आहे.जप्त केलेले पिस्तूल हे राजकुमार उके याच्याकडून घेतल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. उके याला एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो तुरुंगात आहे. सायन कोळीवाडा येथे करंबेळकर याचे काही मित्र आहेत. त्याने विशाल आमकर, अनिल आमकर, संदीप पवार व राजकुमार उके अशी काही नावे पोलिसांना सांगितली आहेत. यासंबधीची माहिती महाराष्ट्र व मुंबई पोलिसांनाही कळविली आहे. लवकरच तेथील पोलिसांचे एक पथक मडगावात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये व मडगाव एलआयबी पोलीस पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कमलाकार कोठारकर, हवालदार सावळो नाईक ऊर्फ एमआरफ, सुभाष नाईक, शेखर राऊत व विकास कौशिक यांनी केली. (प्रतिनिधी)फेब्रुवारी २00७ साली रत्नागिरी येथील फैयाझ हकीम याच्या खूनप्रकरणात करंबेळकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नाशिक येथील कारागृहात तो ही शिक्षा भोगत होता. आॅक्टोबर २0१0 साली त्याला तीन महिन्यांचा पॅरोल संमत झाला होता. त्यानंतर काही दिवस रत्नागिरी व नंतर मुंबईला आपल्या मित्रांसमवेत राहिल्यानंतर दोन वर्षापूर्वी त्याने आपले बस्तान मडगावात हलविले होते. मुंबईत असताना करंबेळकर याने घाटकोपर येथे एका इसमावर खुनी हल्ला चढविला होता. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे.