शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकारपणे वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ

By admin | Updated: January 29, 2015 23:40 IST

धूमस्टाईलचे वेड : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडीची चावी...

चिपळूण : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येपासून बेदरकारपणे धूमस्टाईलने वाहने चालवून मोठ्या प्रमाणावर अपघात झाल आहेत. या अपघातात अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. दुचाकी चालविण्याच्या वाढत्या क्रेझमुळे अपघातांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये सध्या धूमस्टाईल दुचाकी चालविण्याची क्रेझ आली आहे. १८ वर्षांच्याखालील अनेक तरुण तिघे तिघे मिळून, वेगाने रस्त्यावरुन गाडी पळवताना दिसतात. यामुळे, अनेक लहान मोठे अपघात होतात. या अपघातात मोडतोड होते. रस्त्यावरुन घसरुन गाडीचे व स्वत:चे नुकसान होते. गेल्या तीन दिवसात २० पेक्षा जास्त अपघात झाले. शिरगांव, सावर्डे व चिपळूण पोलीस ठाण्यात कमी अधिक प्रमाणात त्याची नोंद झाली आहे. चिपळूण-कऱ्हाड मार्गावर दुचाकी अपघातात रविवारी रात्री श्रीकांत शिंगाडे मृत्युमुखी पडला. त्याचा भाऊ बाबासाहेब शिंगाडे गंभीर जखमी झाला. प्रजासत्ताक दिनी सकाळी आठ वाजण्यापूर्वी खेर्डी एमआयडीसी संभाजीनगरचे दोन तरुण चिपळूण येथे आले. आपल्या मित्राला बरोबर घेऊन ते सती येथे कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना, त्यांची दुचाकी एका मारूती ओमनी गाडीवर आदळली. एकजण पुढे उडाला, एकजण मागे उडाला व मधे बसलेल्या रुद्राक्ष जंगम याच्या पायाला जबरदस्त मार लागला. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. आकाश वडगावकर व अमित शिंदे हेही जखमी झाले होते. या अपघातात ओमनीचे मोेठे नुकसान झाले. याखेरीज उदय नलावडे, शिवाजी कदम, योगेश खोपटकर व शैलेश चव्हाण, संतोष आवळकर, अशोक जाधव, वैभव शिंदे, राकेश राडे, दिनेश पवार, विजय पाष्टे, महेश विचारे, धमेंद्र राय, प्रवीण कुरुप असे अनेकजण अपघातात जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)लहान वयात पालक मुलांना दुचाकी देतात. त्यांच्याकडे गाडी चालवायचा परवानाही नसतो, गाडी चालवण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान त्यांना नसते. शिवाय, त्यांना परिणामाची भीती नसते. त्यामुळे, बेदरकारपणे वाहन चालवून ते स्वत:सह रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीवाशी खेळतात व वाहनांची मोडतोड करीत असतात. पालकांनीच आपला पाल्य सज्ञान होईपर्यंत तरी, त्याच्या हाती दुचाकी देऊ नये. अन्यथा हे असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. - शांताराम साप्ते, वाहतूक हवालदार, चिपळूण