शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खेडजवळ अपघात; शिरगावचे दोघे ठार

By admin | Updated: February 22, 2016 00:17 IST

पाच गंभीर : लग्नाला जाताना सुमोची कारला धडक

शिरगाव : आपल्या जीवलग मित्राच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून शिरगावकडे सँट्रो कारने येत असताना खवटी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे समोरून येणाऱ्या टाटा सुमोला धडक बसल्यामुळे शिरगाव तावडेवाडी (ता. देवगड) येथील दोन युवक जागीच ठार झाले, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२ वाजून सहा मिनिटांनी घडली. या अपघातात प्रसाद सुरेश तावडे (वय २७) आणि तुषार शामसुंदर तावडे (२९, दोघेही रा. शिरगाव) हे दोघे ठार झाले आहेत. शिरगाव तावडेवाडी येथील तुषार शामसुंदर तावडे, प्रसाद सुरेश तावडे, नरेश विजय तावडे (२७), यतीन राजाराम तावडे (२८) व योगीत तावडे हे नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतात. हे सर्वजण आपल्या मित्राच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी १९ फेबु्रवारीला रात्री मुंबईहून शिरगावकडे सँट्रो कार (एमएच ०७ क्यू ४१७०)मधून येत होते. प्रसाद तावडे गाडी चालवित होता. प्रसादचा मित्र सागवेकर याचे आज, सोमवारी लग्न आहे. या समारंभासाठी सर्वजण येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील खवटी येथे सँट्रो कारची समोरून येणाऱ्या टाटा सुमो (एमएच ०७ जे ०३१८)शी समोरासमोर धडक झाली. या अपघातात तुषार तावडे व प्रसाद तावडे हे जागीच ठार झाले, तर यतीन राजाराम तावडे, नरेश तावडे आणि योगीत तावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सुमोमधील दोघेजणही या अपघातात जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाहीत. सर्व जखमींना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सुमोचालकाने चुकीच्या बाजूने गाडी आणल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही सुमो सावंतवाडी येथील असून, ती गोव्याहून मुंबईकडे जात होती. या अपघाताची माहिती भ्रमणध्वनीद्वारे शिरगाव येथे समजताच शिरगाव येथील राजे ग्रुपच्या संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक घटनास्थळी रुग्णवाहिकेसह तातडीने रवाना झाले. अपघातातील जखमी यतीन तावडे व नरेश तावडे यांना अधिक उपचारांसाठी तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले. त्यातील नरेश याच्या किडणीला मार लागल्याने त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत तुषार तावडे, प्रसाद तावडे यांचे खेड येथे शवविच्छेदन करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी नातेवाइकांकडे देण्यात आले. तुषार तावडे हा मुंबई येथे कोटक महिंद्रा बॅँकेत डेप्युटी मॅनेजर या पदावर होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी, आई, वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे. त्याचे वडील देवगड अर्बन बॅँकेत कुडाळ शाखेत शाखा व्यवस्थापक असून, आई शिक्षिका आहे. तर प्रसाद तावडे हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. त्याचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. शिरगाववर शोककळा या अपघाताची बातमी सकाळी वाऱ्यासारखी शिरगावात पसरली आणि गावावर शोककळा पसरली. सायंकाळी तुषारचा मृतदेह शिरगाव येथे आणण्यात आला. यावेळी बाजारपेठ बंद ठेवून गावातील सर्वांनीच तावडेवाडीकडे धाव घेतली. अत्यंत शोकाकूल वातावरणात रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आईवडिलांच्या आक्रोशाने सर्वांचेच मन हेलावले. प्रसाद तावडे याचे कुटुंबीय मुंबई येथे असल्याने त्याच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.