सिंधुदुर्गमधील आचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 24, 2023 18:25 IST2023-02-24T18:24:23+5:302023-02-24T18:25:50+5:30
समीरचे दोन वर्षापासून मानसिक संतूलन बिघडले होते

सिंधुदुर्गमधील आचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
आचरा (सिंधुदुर्ग) : आचरा जामडूल येथील समीर परशुराम आचरेकर (३५) याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातील देवघर खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती त्याचे वडील परशुराम आचरेकर यांनी आचरा पोलिस ठाण्यात दिली. याबाबत वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार समीरचे दोन वर्षापासून मानसिक संतूलन बिघडले होते. त्याच्यावर उपचार केले गेले होते.
२ फेब्रुवारी पासून तो आचरा येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता. गुरुवारी नेहमी प्रमाणे दैनंदिन कामे आटोपून दुपारी देवघर खोलीत पोटात बरे नसल्याने झोपला होता. सायंकाळी पाच वाजता मुले क्लासला यायला झाली म्हणून त्याला उठवायला गेलो असता समीर गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत परशुराम आचरेकर यांनी ओरडा मारल्यावर लगतच्या माणसांनी धाव घेतली होती. माहिती मिळताच घटनास्थळी आचरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.