शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी ७ कोटी खच

By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST

पाणलोट कार्यक्रम : अयोग्य नियोजनामुळे सभांमध्ये वादंर्ग

सिंधुदुर्गनगरी : गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामावर गेल्या पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, या कामातील अयोग्य नियोजन आणि दर्जाहीन कामामुळे जिल्हा परिषदेच्या सभा गाजू लागल्या आहेत.शासनाच्या गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत राज्य कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कामांचे नियोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा भरघोस निधी प्राप्त झाला. या निधीतून जिल्ह्याभरात विविध कामे हाती घेण्यात आली व त्यावर प्राप्त झालेला निधी शंभर टक्के खर्चही करण्यात आला. मात्र, राज्य कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कामांची निवड करताना योग्य जागेची निवड न झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने आपल्या सोयीच्या ठिकाणी कामे करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सभांमध्ये सदस्यांनी केला. तर गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांचा तपशील घ्यावा, अशी मागणीही केली होती. त्यानुसार राज्य कृषी अधीक्षक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा भरघोस निधी खर्च झाल्याचे उघड झाले आहे. मात्र या निधीतून झालेली कामे योग्य ठिकाणी झाली नसल्याचाही आरोप सदस्यांकडून होत आहे. तर या कामातील दर्जा पाहता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २००९-१० पासून गेल्या पाच वर्षात माती नाला बंधारे, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, डोंगर उतार आडवे बांध, लूज बोल्डर ट्रक्चर, अर्दन ट्रक्चर आदी लाखो रूपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, कामांमुळे येथील जनतेला त्याचा किती लाभ झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची आजची स्थिती काय? किती बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जाते? किती शेती ओलिताखाली आली आहे? हा मोठा गौण प्रश्न आहे.राज्य कृषी अधीक्षक कार्यालयाकडून या कामांचे नियोजन केले जाते. मात्र या योजना व कामांची माहिती स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना दिली जात नाही. कामाची ठिकाणे ठरविताना विश्वासात घेतले जात नाही. आपल्या सोयीच्या ठिकाणी बंधारे उभारून नाहक अनाठायी शासनाचा निधी खर्च होत असल्याबाबत संशय सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षातील तब्बल ७ कोटींच्या कामाभोवती संशयाचे वारे वाहू लागले आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणलोटची कामे जिल्ह्यात होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवतच आहे. अद्यापही जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. शेती, बागायतींसाठी पाण्याची वानवाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामांचा दर्जा आणि खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रूपये निधीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)गेल्या पाच वर्षातील खर्चाची आकडेवारीसन २००९- १० मध्ये माती नाला बांध- ३७ लाख ५५ हजार, सिमेंट नाला बांध- ४८ लाख ६६ हजार, वळण बंधारे- ९ लाख ९९ हजार, शेततळे- २ लाख ९९ हजार असा एकूण ९९ लाख १९ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.सन २०१०- ११ मध्ये माती नाला बांध- ९१ लाख ४१ हजार, डोंगर उतार आडवे बांध- १ लाख ४५ हजार असा एकूण १ कोटी निधी खर्च झाला आहे. सन २०११- १२ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ४ लाख २५ हजार, अर्दन ट्रक्चर- ५ लाख २४ हजार, माती नाला बंधारे- १ कोटी १२ लाख २५ हजार असा मिळून १ कोटी २१ लाख ७४ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. सन २०१२-१३ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ४ लाख १२ हजार, अर्दन ट्रक्चर- १० लाख ५५ हजार, माती नाला बंधारे- १ कोटी ४ लाख ८३ हजार असा मिळून १ कोटी १९ लाख ५० हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.सन २०१३-१४ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ९ लाख २८ हजार, अर्दन ट्रक्चर- ३४ लाख, माती नाला बंधारे- १ कोटी ३४ लाख ३८ हजार, सिमेंट नाला बंधारे- ८४ लाख ९३ हजार, वळण बंधारे- २ लाख ४ हजार असा मिळून २ कोटी ३३ लाख ८१ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.