सिंधुदुर्गातील पूरबाधित गावे जाहीर, कोणती अन् किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:17 IST2025-05-28T19:16:45+5:302025-05-28T19:17:06+5:30

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात बऱ्याच वेळा अती मुसळधार पाऊस पडतो. परिणामी नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली ...

45 villages affected by floods in Sindhudurg district | सिंधुदुर्गातील पूरबाधित गावे जाहीर, कोणती अन् किती.. जाणून घ्या

संग्रहित छाया

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात बऱ्याच वेळा अती मुसळधार पाऊस पडतो. परिणामी नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली जातात. ज्या भागात पूर येतो, अशी पूरबाधित गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांसह आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात ४५ गावे पूर बाधित असून यात ५५७४ लोक बाधित होत आहेत.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात पाणी शिरते, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. घरात, दुकानात, शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान जिल्हावासीयांना सहन करावे लागते.  ज्या भागात गावात पूर येतो अशी ४५ गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. यात सावंतवाडी तालुक्यातील ९ गावे ८३५ लोक, वेंगुर्ला तालुक्यातील ७ गावे ७८२ लोक,

कुडाळ तालुक्यातील ५ गावे ६३२ लोक, मालवण तालुक्यातील ६ गावे १५०५ लोक, कणकवली तालुक्यातील ६ गावे ४८० लोक, देवगड तालुक्यात ५ गावे ३४० लोक आणि वैभववाडी तालुक्यातील ७ गावे आणि १००० बाधित लोकसंख्या आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजनांसह आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

पूरबाधित गावे

सावंतवाडी - इन्सुली, बांदा,  शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठी, सातार्डा, सातोसे, वेंगुर्ला - केळुस, कालवी, होडावडा, परबवाडी, सुभाषवाडी, कर्ली, चिपी, कुडाळ - कुडाळ, पावशी, बाव, चेंदवण, सरंबळ, मालवण - मसुरे, मर्डे, बांदिवडे बुद्रुक, मळगाव, बागायत, चिंदर अपराजवाडी, कणकवली-खारेपाटण बाजारपेठ, बंदरगाव, कलमठ, वरवडे, फणसनगर, जानवली, देवगड-मणचे, मालपेवाडी, मुस्लिमवाडी, धालवली मुस्लिमवाडी, कोर्ले, अमिडी बर्ड, कुसूर, नापणे, कोकिसरे, नाथवडे, एडगाव-इनामदारवाडी, सोनुर्ली 

Web Title: 45 villages affected by floods in Sindhudurg district