सखी: चिमुकल्याचा धुरंधर गाण्यावर जबरदस्त डान्स! पाहून नेटकरी झाले फिदा, म्हणाले हा तर AI video...
दोन वर्षांच्या पार्थने 'धुरंधर' चित्रपटातील 'FA9LA' गाण्यावर केलेल्या अप्रतिम नृत्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. त्याचे अचूक हावभाव पाहून काही जण हा AI व्हिडिओ आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत, युजर्स त्याच्या टॅलेंटची प्रशंसा करत आहेत.
पुणे: Pune Crime : ‘आयटी मॅनेजर’ नव्हे तर ड्रायव्हर..! प्रेमसंबंध लपवून तरुणीची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा
पुणे : आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही स्वतःला मॅनेजर असल्याचे भासवून एका तरुणीची फसवणूक करत लग्न केले आणि नंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
व्यापार: "एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही"
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कच्च्या तेलाचं संकट उभं राहिलं आहे. परंतु यादरम्यान भारतानं केलेली कामगिरी मात्र कौतुकास्पद असल्याचं अनेक स्तरातून म्हटलं जातंय. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होत असताना आणि किमती वाढत असताना पाकिस्ताननं केलेले दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
व्यापार: सोनं स्वस्त, चांदी महाग; १ मे रोजीचे ताजे नवे दर काय?
शुक्रवारी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या किमतीत तेजी आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या सत्रात ट्रेडिंग बंद आहे. संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत यामध्ये कमोडिटी ट्रेडिंग होईल. मागील सत्रात ५ जूनच्या डिलिव्हरीचं सोनं ११४ रुपयांच्या वाढीसह १,५१,२२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.
फिल्मी: राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, प्रेरणादायी पोस्ट
अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या आगामी 'बाप्या' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासोबतच ब्रेस्ट कॅन्सरवर मात केल्याचीही तिची प्रेरणादायी कहाणी आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कॅन्सर सर्जरीच्या खुणा आत्मविश्वासाने दाखवल्या. यात तिने महिलांना प्रेरणा देणारी पोस्टही लिहिली आहे. ती म्हणते, " माझ्या शरीरावरील या जखमा मी जिवंत असण्याची गोष्ट सांगतात. प्रत्येक जखम मला याची आठवण करून देते की मी ही लढाई लढले, त्यातून वाचले आणि त्यावर विजय मिळवला आहे. ब्रेस्ट कॅन्सरने व्रण मागे सोडले असले तरी तो माझ्या आत्म्याला कधीच स्पर्श करु शकणार नाही. प्रत्येक महिलेला मी हे सांगू इच्छिते की तुझी जिद्द कमी होण्यापूर्वी ती पुन्हा उभी राहा. तू सुंदर आहेस आणि तुझ्या अंगावरील हे व्रण डाग नसून तुमच्या धैर्याचा मुकूट आहे.
व्यापार: ट्रम्प यांचा 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' स्टंट; इराण तणावात नकाशा केला शेअर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला चकित केलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'चं नाव बदलून 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' असं लिहिलं आहे. ट्रम्प यांनी हा नकाशा अशा वेळी शेअर केला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून आखाती देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तेलाच्या किमती सतत वाढत आहेत.
व्यापार: व्होडाफोन आयडियाला संजीवनी; सरकारकडून २३ हजार कोटींचा दिलासा!
भारताच्या टेलिकॉम सेक्टरमधील एजीआरचा मुद्दा कंपन्यांसाठी दीर्घकाळापासून मोठं ओझं बनला आहे. विशेषतः व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या दबावामुळे सर्वाधिक प्रभावित झाली होती. प्रचंड कर्ज आणि कमकुवत बॅलन्स शीटमुळे कंपनीसमोर कामकाज सुरू ठेवण्याचं आव्हान होतं. अशा परिस्थितीत, दूरसंचार विभागाचा (DoT) नवीन निर्णय कंपनीसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे.
मध्य प्रदेश: जबलपूरमध्ये पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील बर्गी धरणात क्रूझ बोट उलटून नऊ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने पंधरा जणांना वाचवले, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र: मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीजमध्ये नोंद; प्रवास होणार जलद
मुंबई-पुणे मिसिंग लिंक बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. आज महाराष्ट्र दिनी याचे लोकार्पण होईल. २३.५ मीटर रुंदीचा बोगदा प्रवास जलद करणार. एवढ्या रुंदीचा बोगदा तयार करताना माती ढासळण्याची भीती असते. त्यामुळे सहसा १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बोगदे खणले जात नाहीत. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पाहता २३.५ मीटर रुंदीचा बोगदा तयार केला आहे
मुंबई: मराठी शिका, पण भाषेवरून हिंसा नको: फडणवीस
महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकावी, असे फडणवीस म्हणाले. भाषेवरून हिंसा करणे योग्य नाही. मराठी भाषा सोपी असून शिकण्यास मदत करू, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
व्यापार: प्रथमच डॉलरचा भाव गेला ९५ रुपयांवर, जीवनावश्यक वस्तू महागणार
तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे आयात खर्च वाढेल आणि महागाई वाढेल. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरबीआयने हस्तक्षेप करूनही रुपया सावरत नसल्याचे चित्र असून, त्यामुळे येत्या काळात महागाईचे चटके सामान्यांना बसू शकतात. २ महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे २० अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.
महाराष्ट्र: विधान परिषदेच्या दहा जागा बिनविरोध; महायुतीला नऊ तर मविआला एक जागा
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या दहा जागा बिनविरोध झाल्या. महायुतीने नऊ जागा जिंकल्या, ज्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे. मविआला एक जागा मिळाली, उद्धव सेनेचे उमेदवार अंबादास दानवे परिषदेवर जाणार आहेत. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत विलीन केला आणि आमदारकी मिळविली.
राष्ट्रीय: पश्चिम बंगाल : निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! ममता बॅनर्जींचा EVM मध्ये छेडछाडीचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. ममता बॅनर्जींनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे, यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले आहेत. स्ट्रॉन्ग रूम पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही, असे आयोगाने म्हटले आहे.
क्रिकेट: 'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सच्या संघाने गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा धक्का दिला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरुचा संघ १५५ धावांवर ऑलआउट झाला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना 'प्रिन्स' शुभमन गिलनं तुफान फटकेबाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. भुवीच्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद केल्यावर किंग कोहलीनं एकच जल्लोष केला. पण शेवटी गुजरात टायटन्सच्या संघाने ४ विकेट्स आणि २५ चेंडू राखून सामना खिशात घातला.
क्रिकेट: GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
आयपीएल २०२६ स्पर्धेत गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात अंपायरच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रजत पाटीदारच्या रुपात आरसीबीनं तिसरी विकेट गमावली. जेसन होल्डरनं घेतलेला झेल योग्य नाही, असा आक्षेप घेत विराट कोहली सीमारेषेच्या बाहेर पंचांशी हुज्जत घालताना दिसला.
धाराशिव: धाराशिवच्या तरुण शेतकऱ्याची कमाल: एआयच्या मदतीने उसाचे विक्रमी उत्पादन!
हर्षवर्धन गुंड या २१ वर्षीय शेतकऱ्याने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एक एकरात १०३ टन उसाचे उत्पादन घेतले. तंत्रज्ञानाचा वापर करत दुप्पट उत्पन्न मिळवले व इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला.
व्यापार: सेन्सेक्स ५८२ अकांनी कोसळला, तर निफ्टी २३,९९७ वर बंद; 'या' ४ कारणांनी बाजारात हाहाकार...
आज(दि.३०) आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारदिनी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसभर दबावाखाली राहिलेल्या बाजारात शेवटच्या तासात काहीशी सावरलेली स्थिती दिसली, मात्र तोटा भरून निघू शकला नाही. BSE Sensex ५८२ अंकांनी घसरून ७७,००० च्या खाली ७६,९१३ वर बंद झाला, तर Nifty 50 १८० अंकांनी घसरून २४,००० च्या खाली २३,९९७ वर स्थिरावला.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या, लुटीनंतर खून
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाची, किशोर हिवाळे, दारूच्या दुकानाजवळ चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी आरोपींनी एका व्यापाऱ्याला लुटले. पोलिसांनी तीन तासांत दोन संशयितांना अटक केली, ज्यात अनेक गुन्हे असलेला कुख्यात गुन्हेगाराचा समावेश आहे.
राष्ट्रीय: ममता बॅनर्जींनी एक्झिट पोल फेटाळले; केली मोठी भविष्यवाणी
ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोल फेटाळले, तृणमूल काँग्रेस २२६ जागांपेक्षा जास्त जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हे आकडे केवळ तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी जाहीर करण्यात आले आहेत, असा आरोपही त्यांनी केेला आहे. एवढेच नाहीतर, हे सर्व अंदाज बनावट आहेत आणि एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयातून आले आहेत, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
व्यापार: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ₹२ कोटींचे कर्ज! जाणून घ्या 'या' योजनेची संपूर्ण माहिती...
देशातील सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी (MSME) दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता उद्योजकांना कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता ₹२ कोटींपर्यंत व्यवसाय कर्ज मिळू शकणार आहे. ही सुविधा CGTMSE या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून MSME क्षेत्राला चालना देण्यासाठी ही महत्त्वाची पाऊल उचलण्यात आली असून, नव्या तसेच विद्यमान उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.
व्यापार: पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची भूमिका चर्चेत आली आहे. स्वतःला मध्यस्थ म्हणवणाऱ्या पाकवर आता अमेरिकेकडून फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने इराणला रशिया, चीन आणि इतर देशांसोबत व्यापार सुरू ठेवण्यासाठी जमिनीमार्गे सहा नवीन मार्ग उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय: बंगालमध्ये त्रिशंकू झाल्यास काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? खर्गेंनी स्पष्ट सांगितले
पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोल भाजपच्या बाजूने कल दर्शवत आहेत. त्रिशंकू विधानसभा झाल्यास ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचे खर्गे यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले, अंतिम निकालाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले. काही एक्झिट पोलमध्ये भाजप, तर काहीमध्ये टीएमसीला बहुमत दिसत आहे...
व्यापार: ट्रम्प यांना US सुप्रीम कोर्टाचा झटका; १६६ अब्ज डॉलर्स रिफंड करावे लागणार, भारताला किती मिळणार?
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता आयातदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर येत्या ११ मेपासून टॅरिफ रिफंड प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आदेशानुसार, या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
व्यापार: गोल्ड बॉन्डनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, २९५% चा रिटर्न
सोनं हे नेहमीच भारतीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिलं आहे, परंतु आता फिजिकल गोल्डऐवजी डिजिटल आणि सुरक्षित पर्याय वेगानं लोकप्रिय होत आहेत. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोव्हरेन गोल्ड बाँड (SGB), ज्यानं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊन थक्क केलंय. अलीकडेच आरबीआयनं (RBI) SGB 2019-20 सीरिज-VI साठी 'प्री-मॅच्युअर रिडेम्प्शन' किंमत घोषित केली आहे.
हिंगोली: उष्णतेपासून दिलासा! हिंगोलीतील शेतकऱ्याने म्हशींसाठी उभारला जलतरण तलाव.
हिंगोलीतील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी तीव्र उकाड्यामुळे म्हशींसाठी जलतरण तलाव बांधला. यामुळे दुग्ध उत्पादन टिकून राहण्यास मदत झाली. मांडगे यांच्या उपक्रमामुळे इतर पशुपालकांना प्रेरणा मिळत आहे.
व्यापार: अनिल अग्रवालांच्या 'वेदांता'चे शेअर ६५% कोसळले; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय..?
उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी सुमारे ६५% घसरण झाल्याचे दिसताच गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र ही घसरण प्रत्यक्षात नुकसान नसून, कंपनीच्या डिमर्जरमुळे झालेल्या प्राइस अॅडजस्टमेंटचा परिणाम आहे.
व्यापार: उद्या शेअर बाजार बंद राहणार का? ट्रेडिंगपूर्वी हॉलिडे कॅलेंडर तपासा
जर तुम्ही शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. उद्या म्हणजेच शुक्रवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त देशातील प्रमुख शेअर बाजार NSE आणि BSE बंद राहतील. यामुळे या आठवड्यात बाजारामध्ये केवळ चार दिवसच व्यवहार होऊ शकले आहेत. २०२६ च्या कॅलेंडरनुसार यावर्षी एकूण १६ सरकारी सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या होत्या,
पिंपरी -चिंचवड: ‘तो' पळत होता… पण संशयित थांबले नाहीत..! २१ गोळ्यांनी देहूरोड हादरलं
पिंपरी : तीन महिन्यांपूर्वी धमकी देऊन पाळत ठेवून संशयितांनी रमेश रेड्डी (रा. देहूरोड) याचा भर रस्त्यात खून केला. रमेश आणि त्याचा मित्र मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री देहूरोड येथील संतोष स्वीट मार्टच्या मागील कपड्यांच्या दुकानात गेले होते. कपडे घेऊन दुचाकी सुरू करत असतानाच मोटारीतून आणि दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांना घेरले. संशयितांच्या हातात पिस्तूल आणि कोयता होता.
व्यापार: पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी वाढली असून, रस्त्यावर आता इलेक्ट्रिक कार आणि बाईक/स्कूटरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण वाहन विक्रीमध्ये EV चा वाटा अजूनही मर्यादित असला, तरी काही कंपन्यांनी या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. त्यात विशेषतः JSW MG Motor India ने उल्लेखनीय कामगिरी करत बाजारात खळबळ माजवली आहे.
व्यापार: Personal Vs Gold Loan: ₹५ लाखांची गरज भासल्यास कोणता पर्याय निवडावा? जाणून घ्या...
आर्थिक गरज कधीही उद्भवू शकते. अशा वेळी बचत अपुरी पडल्यास अनेक जण कर्ज घेतात. विशेषतः ५ लाख रुपयांसारखी मोठी रक्कम अचानक लागल्यास 'गोल्ड लोन' आणि 'पर्सनल लोन' हे दोन प्रमुख पर्याय डोळ्यासमोर येतात. मात्र, या दोन्हींपैकी नेमका कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
छत्रपती संभाजीनगर: उभ्या वाहनाला रिक्षाची धडक; हळदीला निघालेल्या भावाचा मृत्यू.
तुलसी हॉटेलजवळ झालेल्या रिक्षा अपघातात राजू जगधने (35) यांचा मृत्यू झाला, मुलगी जखमी. ते बहिणीच्या हळदी समारंभासाठी निघाले होते. पत्नी व लहान मुलांसह कुटुंबाचा आधार हरपला आहे.