Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > अनिल अग्रवालांच्या 'वेदांता'चे शेअर ६५% कोसळले; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय..?

अनिल अग्रवालांच्या 'वेदांता'चे शेअर ६५% कोसळले; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय..?

Vedanta Limited Share: अचानक शेअर्स का घसरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:00 IST2026-04-30T14:58:05+5:302026-04-30T15:00:09+5:30

Vedanta Limited Share: अचानक शेअर्स का घसरले?

Vedanta Limited Share: Anil Agarwal's 'Vedanta fell by 65%; investors are in a state of shock, what is the real reason..? | अनिल अग्रवालांच्या 'वेदांता'चे शेअर ६५% कोसळले; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय..?

अनिल अग्रवालांच्या 'वेदांता'चे शेअर ६५% कोसळले; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय..?

Vedanta Limited Share: उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी(दि.३०) सुमारे ६५% घसरण झाल्याचे दिसताच गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, ही घसरण प्रत्यक्षात नुकसान नसून, कंपनीच्या डिमर्जरमुळे झालेल्या प्राइस अ‍ॅडजस्टमेंटचा परिणाम आहे.

शेअरमध्ये मोठी घसरण का दिसली?

बुधवारी वेदांता शेअर ७७३.६० रुपयांवर बंद झाला होता. तर, गुरुवारी तो थेट २८९.५० रुपयांवर उघडला आणि इंट्राडेमध्ये २७१.५ रुपयांपर्यंत खाली आला. ही मोठी घसरण प्रत्यक्षात कंपनीच्या कामगिरीमुळे नसून डिमर्जर प्रक्रियेचा तांत्रिक परिणाम आहे.

डिमर्जरमध्ये काय घडणार?

वेदांताने आपल्या व्यवसायाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत खालील चार स्वतंत्र युनिट्सची मूल्ये मूळ कंपनीपासून वेगळी करण्यात आली आहेत:

  1. वेदांता अॅल्युमिनीयम
  2. वेदांता पॉवर
  3. वेदांता ऑईल अँड गॅस
  4. वेदांता स्टील अँड आयरन

यामुळे मूळ वेदांता शेअरच्या किमतीत या व्यवसायांची किंमत राहिली नाही, त्यामुळे शेअर कमी झाल्यासारखा दिसत आहे.

रेकॉर्ड डेट आणि Ex-Demerger ट्रेडिंग

कंपनीने १ मे ही रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. मात्र महाराष्ट्र दिनामुळे बाजार बंद असल्याने ३० एप्रिललाच प्रभावी रेकॉर्ड डेट मानण्यात आली. या दिवशी शेअर ex-demerger ट्रेड झाला, म्हणजे नव्या कंपन्यांची किंमत त्यात समाविष्ट नव्हती.

गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ?

तज्ञांच्या मते, ही प्रक्रिया दीर्घकालीन दृष्टीने सकारात्मक ठरू शकते. SAMCO Securities च्या विश्लेषकांच्या मते, प्रत्येक व्यवसाय स्वतंत्र लिस्ट झाल्यावर त्याची खरी बाजारमूल्ये स्पष्ट होतील. यामुळे गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : वेदांता के शेयर 65% गिरे: डीमर्जर से निवेशकों में घबराहट, कारण स्पष्ट

Web Summary : वेदांता के शेयर 65% गिरने से निवेशकों में चिंता फैल गई। यह गिरावट नुकसान नहीं, बल्कि वेदांता के व्यवसायों के अलग-अलग इकाइयों में डीमर्जर के कारण मूल्य समायोजन था। विश्लेषकों का मानना है कि इससे निवेशकों को केंद्रित क्षेत्र के अवसर मिलेंगे।

Web Title : Vedanta Shares Plunge 65%: Demerger Causes Investor Jitters, Explained

Web Summary : Vedanta shares plummeted 65%, sparking investor anxiety. This drop wasn't a loss, but a price adjustment due to the demerger of Vedanta's businesses into separate units. Analysts believe this restructuring could unlock value and provide investors focused sector opportunities.