फिल्मी: 'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचे उत्तर
‘धुरंधर’ फ्रँचायझीवर 'प्रोपागंडा' चित्रपट असल्याचा आरोप करत काहींनी टीका केली. आता या वादावर ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून त्यांनी या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले आहे. ते म्हणाले की, "मला माहित नाही की प्रोपागंडा चित्रपट म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, पण मला 'धुरंधर' चित्रपट खूप आवडला. हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर मला या फ्रँचायझीचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा जास्त आवडला.प्रत्येक चित्रपटाची आणि कथेची स्वतःची एक विचारधारा असते. केवळ एखाद्या वर्गाला ती कथा आवडली नाही म्हणून त्याला 'प्रोपागंडा' म्हणणे चुकीचे आहे."
बीड: बीड: भाच्याकडून विश्वासघात, 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार.
बीडमध्ये मामा-मामी शेतात गेल्यावर एका 29 वर्षीय भाच्याने 10 वर्षीय अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केला. हा अत्याचार गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होता. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला इटकूरमधून अटक केली.
पुणे: Crime News : थेऊरमध्ये चिमुकलीला एकट पाहून अत्याचाराचा प्रयत्न;आरोपी अटकेत
उरुळी कांचन (पुणे जि. ) : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. थेऊर परिसरात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि. ५) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर: औट्रम घाट बोगदा प्रकल्प: १६ वर्षे रखडला, खर्च वाढला, नवीन डीपीआर
सोलापूर-धुळे महामार्गावरील औट्रम घाट बोगदा प्रकल्पाला विलंब. १६ वर्षांपासून मंजुरी, रद्द करणे, पुनर्विचार यातच वेळ गेला. खर्च ७ हजार कोटींवर. १३ कि.मी. बोगद्यासाठी आता चौथा डीपीआर सुरू.
राष्ट्रीय: पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? ही नावं चर्चेत
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर ९ मे रोजी शपथविधी आहे. मुख्यमंत्रीपदासाठी महिलांची नावे चर्चेत असून, अग्निमित्रा पॉल आणि रूपा गांगुली यांच्या नावांचा समावेश आहे. शुभेंदू अधिकारी प्रबळ दावेदार असले तरी, अंतिम निर्णय बैठकीत ठरेल.
नांदेड: संशयी पतीला विजेचा शॉक देऊन पत्नीने मारले; मुलाच्या साक्षीने जन्मठेप.
नांदेड जिल्ह्यात संशयी पत्नीने नवऱ्याला विजेचा शॉक देऊन मारले. मुलाच्या साक्षीने आणि इतर पुराव्यामुळे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीने हे कृत्य केले. ही घटना 2019 मध्ये घडली. न्यायालयाने 6 मे रोजी निकाल दिला.
राष्ट्रीय: विजय यांचा सत्ता स्थापनेचा दावा, पण राज्यपालांनी मागितला बहुमताचा आकडा
अभिनेता विजय यांच्या पक्षाने तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या, पण बहुमत नाही. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली, पाठिंब्याचा दावा केला, पण त्यांना ११८ सह्या सुरक्षित करण्यास सांगितले. काँग्रेसने पाठिंबा दर्शविला, ज्यामुळे लहान पक्षांच्या मदतीने आवश्यक आकडा गाठता येऊ शकतो.
राष्ट्रीय: कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशातील वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता वाढवली आहे. या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच केनाइन डिस्टेंपर व्हायरस (CDV) मुळे एका वाघीणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही घटना मोठा इशारा मानली जात आहे. विशेष म्हणजे हा घातक व्हायरस कुत्र्यांमधून वन्यप्राण्यांमध्ये पसरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
व्यापार: पोस्ट ऑफिसची दमदार योजना; ₹२.२५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल ₹९८ हजारांचा परतावा
सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट (TD) योजना एक विश्वासार्ह पर्याय आहे. या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवल्यास गॅरंटेड परतावा मिळतो. विशेष म्हणजे ही भारत सरकार समर्थित बचत योजना असल्याने गुंतवणुकीची सुरक्षितताही सुनिश्चित मानली जाते.
पुणे: "माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
"मी घरी पोहोचले तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. अंगावर नखांचे ओरखडे होते. माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला फाशी द्या." हा आक्रोश आहे पुण्यातील पर्वती भागात अत्याच्याराचा प्रयत्न झालेल्या चिमुकलीच्या आईचा. सख्ख्या आजोबानेच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेने पुणे हादरून गेलं आहे.
व्यापार: जमीन खरेदी ते इमारतीचे बांधकाम..; 'ही' बँक MSME's ना देते ₹५० कोटींपर्यंतचे कर्ज
देशाच्या आर्थिक विकासात MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रोजगारनिर्मितीपासून ते उत्पादन वाढीपर्यंत MSME क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने MSME, एअरलाइन आणि इतर कंपन्यांच्या कार्यशील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
बीड: कौटुंबिक भांडणातून खून: बीडमध्ये टिप्पर चालकाची हत्या
बीड जिल्ह्यातील केज येथे कौटुंबिक भांडणातून मंगेश माने याने टिप्पर चालक खुशालराम ठोंबरे यांचा काठीने मारहाण करून खून केला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच ठोंबरे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
ऑटो: सैनिकांसाठी Mahindra ने आणली नवीन Thar; पॉवरफुल डिझेल इंजिनसह मिळणार 'हे' फीचर्स...
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Mahindra ने भारतीय सुरक्षा दलांसाठी खास ATV (ऑल-टेरेन व्हेईकल) वाहन तयार केले आहे. हे वाहन Mahindra Thar Roxx वर आधारित असून अवघड भूप्रदेश, सीमावर्ती भाग आणि लष्करी मोहिमांसाठी विशेष डिझाइन करण्यात आले आहे. कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी या वाहनाची माहिती दिली. भारतीय सैन्याच्या ट्रायलनंतर गरजेनुसार या वाहनांची खरेदी केली जाऊ शकते.
फिल्मी: अरिजीत सिंहनंतर संगीतविश्वातील लोकप्रिय गायिकेने दिले निवृत्तीचे संकेत
काही महिन्यांपूर्वी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली. अरिजीतच्या या निर्णयाने संगीतविश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. आता अरिजीतनंतर आणखी एका गायकाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. याशिवाय सध्याच्या संगीत सृष्टीवर निशाणा साधला आहे. ही गायिका म्हणजे इशानी दवे. इशानीने सोशल मीडियावर पोस्ट करुन तिच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
क्रिकेट: IPL 2026: बंगळूरुऐवजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना; प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर
IPL 2026 चा अंतिम सामना बंगळूरुऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर क्वालिफायर 1 धर्मशाला येथे २६ मे रोजी खेळवला जाणार असून. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 न्यू चंडीगड येथे २७ आणि २९ मे रोजी खेळवले जातील. त्यानंतर अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबाद येथे होईल.
राष्ट्रीय: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला असून, भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराच्या भावाचीच हत्या करण्यात आली. राजधानी कोलकातामधील न्यू टाऊन भागात ५ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली आहे.
परभणी: पगारावरील हाव: महाराष्ट्रात एसीबीने 7,886 लाचखोरांना पकडले.
गेल्या दशकात, महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 7,886 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. जनजागृती करूनही, लाचखोरी अजूनही सुरू आहे, त्यामुळे नागरिकांची सतर्कता वाढली आहे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये जास्त प्रकरणे दिसून आली, परंतु अलीकडील वर्षांमध्ये विविध शासकीय क्षेत्रांमध्ये लाचखोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
व्यापार: कर्ज फेडले नाही तर बँक जप्त करणार मालमत्ता; काय आहेत RBI चे नवे ड्राफ्ट नियम?
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने (RBI) आता नवीन 'ड्राफ्ट' नियम जारी केले आहेत. हे नियम कर्ज न फेडल्यास बँकांकडे गहाण ठेवल्या जाणाऱ्या मालमत्तेशी संबंधित आहेत. या नियमांचा मुख्य उद्देश पारदर्शकता वाढवणं आणि बँकांद्वारे अशा मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणं हा आहे.
बीड: आगीत वृद्धाचा करुण अंत; पशुधनही भस्मसात, हळहळ!
धारूर तालुक्यातील रेपेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका वृद्धाचा मृत्यू झाला. आगीत १० गायी, १५ शेळ्या, १५० कोंबड्या जळून खाक झाल्या. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू.
व्यापार: दिग्गज ऑटो कंपनीची मोठी घोषण; भागधारकांना प्रति शेअर मिळणार ₹७५ चा लाभांश...
देशातील आघाडीची टू-व्हिलर उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने मंगळवारी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. यासह कंपनीने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर तब्बल ७५ रुपयांच्या अंतिम डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय: अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
पश्चिम बंगाल आणि आसाममधील निकालाने भाजपाविरोधी पक्ष मात्र सावध झाल्याचे दिसत आहेत. पुढच्या वर्षी निवडणूक होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशात याचे परिणाम होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आयपॅक या निवडणूक रणनीती ठरवणाऱ्या संस्थेसोबतचा आपला करारच रद्द केला आहे.
परभणी: पहाटे शेतात नेऊन पत्नीचा खून, पतीची पोलीस ठाण्यात कबुली
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून केला. आरोपी श्रीधर गायकवाड याने पत्नी सुमित्रा गायकवाडला शेतात नेऊन डोक्यात दगड घालून मारले आणि पोलीस ठाण्यात गुन्हा कबूल केला. पोलीस तपास करत आहेत.
व्यापार: SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग चार दिवस बँक बंद राहणार, जाणून घ्या तारखा...
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. SBI कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांचा संप आणि दोन दिवसांच्या सुट्ट्या, अशाप्रकारे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळेच, ग्राहकांनी पटापट बँकेशी संबंधित कामे करून घ्यावी.
व्यापार: कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक! रिझर्व्ह बँकेचा इशारा, राहा सावध!
तुमच्याकडेही असा एखादा कॉल किंवा मेसेज आला आहे का, ज्यामध्ये तुमचz कर्ज माफ करण्याबाबत सांगण्यात आलंय? अशा प्रकरणांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सर्वसामान्यांना एक मोठं आवाहन केलंय. कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याचा सतर्कतेचा इशारा आरबीआयनं दिलाय.
महाराष्ट्र: शासकीय कर्मचाऱ्यांची घेणार हिंदी परीक्षा; सरकारच्या निर्णयामुळे वादंग
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा सक्तीची केल्याने वाद निर्माण झाला आहे. मराठी अभ्यास केंद्र आणि मनसेने याला विरोध करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा २८ जून, २०२६ रोजी घेण्यात येईल असं राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे.
व्यापार: Vi चे शेअर तेजीत; नेतृत्वातील बदलांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवत Vi (Vodafone Idea Limited) च्या शेअर्समध्ये नुकतीच मोठी वाढ पाहायला मिळाली. कंपनीनं नेतृत्वात मोठा बदल करत कुमार मंगलम बिर्ला यांची पुन्हा एकदा 'नॉन-एग्जीक्यूटिव्ह चेअरमन' म्हणून नियुक्ती केली आहे. या बातमीनंतर ६ मे रोजी बाजार उघडताच कंपनीचा शेअर सुमारे ४% वधारून ₹११.२४ वर पोहोचला, जो गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचं प्रतीक मानल जात आहे.
व्यापार: मध्य पूर्वेतील तणावामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवे दर काय?
मध्य पूर्वेत बदलणाऱ्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या कमोडिटी बाजारावरही पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ६ मे २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आज सोन्याचा भाव १,५१,८०९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५०,४९९ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
व्यापार: सेन्सेक्स, निफ्टी तेजीत; 'या' शेअर्सची जोरदार सुरुवात
देशांतर्गत शेअर बाजारात आज वाढीसह कामकाजाची सुरुवात झाली. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ४०६.५७ अंकांच्या (०.५३ टक्के) तेजीसह ७७,४२४.३६ अंकांवर उघडला. तर, एनएसईच्या निफ्टी ५० इंडेक्सनं देखील आज १३८.२० अंकांच्या (०.५८ टक्के) वाढीसह २४,१७१.०० अंकांवर व्यवहार सुरू केला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीचे बहुतेक शेअर्स ग्रीन झोनमध्ये उघडले.
व्यापार: रेल्वेसाठी ₹२३,४०० कोटींची मंजुरी; ६ राज्यांना मल्टी-ट्रॅकिंगचा फायदा
देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारने रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या मेगा योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येणाऱ्या काळात हा निर्णय प्रवाशांपासून ते उद्योगजगतापर्यंत सर्वांसाठी मोठे बदल घडवून आणणारा ठरू शकतो.
महाराष्ट्र: नसरापूर प्रकरण: राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होऊ शकतो: असीम सरोदे
राज ठाकरेंनी नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीला हालहाल करून मारावे या वक्तव्यावर वकील असीम सरोदे यांनी आक्षेप घेतला आहे. अशा चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सरोदे यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांची मोठी घोषणा, होर्मुझमधील 'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, कारण...
इराणबरोबरच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी 'प्रोजेक्ट फ्रीडम' काही काळासाठी स्थगित केले आहे. परंतु इराणी बंदरांची नाकेबंदी सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केले. इराणविरुद्धच्या मोहिमेत मिळालेल्या लष्करी यशाचा हवाला देत तसेच शांतता करारासंदर्भात इराणी प्रतिनिधींसोबत झालेल्या योग्य वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीवरून आम्ही अंतिम करारापर्यंत प्रोजेक्ट फ्रीडम काही काळासाठी स्थगित केले आहे परंतु नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील असं त्यांनी म्हटलं.