Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग चार दिवस बँक बंद राहणार, जाणून घ्या तारखा...

SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग चार दिवस बँक बंद राहणार, जाणून घ्या तारखा...

SBI Banking Services: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:52 IST2026-05-06T11:51:45+5:302026-05-06T11:52:37+5:30

SBI Banking Services: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे? जाणून घ्या...

SBI employees will go on nationwide strike; Banks will remain closed for four consecutive days, know the date | SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग चार दिवस बँक बंद राहणार, जाणून घ्या तारखा...

SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग चार दिवस बँक बंद राहणार, जाणून घ्या तारखा...

SBI Bank Employee Strike: SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. SBI कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांचा संप आणि दोन दिवसांच्या सुट्ट्या, अशाप्रकारे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळेच, ग्राहकांनी पटापट बँकेशी संबंधित कामे करून घ्यावी.

चार दिवस बँक बंद

AISBISF (ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन) ने दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ मे रोजी SBI कर्मचारी संपावर जाणार आहेत. हा संप दोन दिवसांचा असला तरी प्रत्यक्षात ग्राहकांना चार दिवस बँकिंग सेवांचा फटका बसू शकतो.

  • २३ मे – चौथा शनिवार
  • २४ मे – रविवार
  • २५ मे – कर्मचारी संप
  • २६ मे – कर्मचारी संप

यामुळे सलग चार दिवस शाखांमधील अनेक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांनी संप का पुराकरा ?

AISBISF च्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करण्यात आल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी खालील मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे:

  • बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता
  • नोकरीच्या अटी व नियमांबाबत समस्या
  • भरती प्रक्रियेतील अडचणी
  • पेन्शनसंबंधित प्रश्न
  • पूर्वी झालेल्या करारांची अंमलबजावणी न होणे

फेडरेशनने २ मे रोजी SBI चे अध्यक्षांना नोटीस देत हा संप Industrial Disputes Act, 1947 अंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोणत्या सेवा बंद राहणार?

या संपाचा परिणाम मुख्यतः शाखांमधील सेवांवर होणार आहे. त्यामुळे खालील कामे प्रभावित होऊ शकतात:

  • चेक जमा करणे
  • रोख रक्कम जमा किंवा काढणे
  • पासबुक अपडेट
  • शाखेतून होणारे इतर व्यवहार

मात्र, ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ऑनलाइन आणि डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स किंवा शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांचे नियोजन आधीच करून ठेवावे. विशेषतः व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी व्यवहारांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : एसबीआई राष्ट्रव्यापी हड़ताल: बैंक चार दिन बंद रहेंगे।

Web Summary : एसबीआई कर्मचारियों की दो दिवसीय हड़ताल और सप्ताहांत की छुट्टियों के कारण 23 मई से बैंक चार दिनों तक बंद रहेंगे। कर्मचारियों की कमी और अनसुलझे मुद्दों के कारण सेवाएं प्रभावित होंगी। ऑनलाइन लेनदेन चालू रहेगा; ग्राहक उसी अनुसार योजना बनाएं।

Web Title : SBI nationwide strike: Banks to remain closed for four days.

Web Summary : SBI employees' two-day strike, coupled with weekend holidays, will keep banks closed for four days starting May 23rd. Services will be impacted due to staff shortages and unresolved issues. Online transactions will remain functional; customers should plan accordingly.